Saturday, 15 December 2018



‘राजमाची’ एक पावसाळी सफर…….




राजमाची ट्रेक चा प्लान जवळ-जवळ महिन्याभरापासून तयार होता. 29जून 2018 ला शनिवारी कोंढाना मार्गे राजमाची करावयचे ठरले होते मात्र शनिवारी अचानक प्लान रद्द करावा लागला. व दुस-यादिवशी रविवार लोनावळा मार्गे जायचे ठरले. रविवार सकाळपर्यंत अजुन एक जन कॅन्सल झाला. मात्र ठरल्याप्रमाणे रविारी सकाळी 5.30 वाजता निघायचे ठरविले. ठरल्याप्रमाणे 5.30 चे 6.30 वाजले. एक फोरव्हिलर व एक बाईक आणि आम्ही सात जन राजमाचीकडे रवाना झालो. बाईक वर मी व उदय, तसेच गाडीमध्ये युवराज, परशुराम, बंटी, संदीप व हेमंत असे सात जन राजमाची कडे रवाना झालो.
उल्हास नदीच्या खो-यात लोनावळयापासून 15 कि.मी.अंतरावर राजमाची किल्ला आहे. या किल्याचे दोन भाग आहेत दोन भाग म्हणन्यापेक्षा दोन स्वतंत्र किल्लेच आहेत. बालेकिल्ला व मुख्य किल्ला असून बालेकिल्याला श्रीवर्धन गड तर मुख्य किल्याला मनरंजन गड असे म्हणतात. भौगोलीक दृष्या या किल्याचे महत्व अधिक होते कारण बोरघाटमार्गे पुण्याकडे जाण्याच्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व जकात वसुलीसाठी अनेक किल्यांचा वापर होत असे त्यातीलच एक महत्वाचा किल्ला आहे.
कल्याणच्या 1657 च्या स्वारीनंतर  त्याच वर्षी शिवाजीमहाराजांनी पुणे आणि कल्याण मार्गावरील बोरघाटातील राजमाची हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. पुढे संभाजी महाराज जिवंत असेपर्यंत म्हणजे 1689 पर्यंत हा किल्ला स्वराज्यातच होता. पुढे 1713 मध्ये  शाहुमहाराजांनी हा किल्ला कान्होजी आंग्रेना दिला. नतंर 1730 मध्ये पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे हा किल्ला आला. पुढे 1818 मध्ये किल्ला इंग्रजांकडे गेला.

            जेमतेम 8.30 वाजता आम्ही कर्जत ला घाट सुरू होण्याआगोदर चहा नाष्टा करून लोनावळा मार्गे राजमची कडे निघालो. मात्र मेन रोड सोडून आत निघालो तोच 2 किलोमीटर च्या पुढे जेमतेम गेलो असणार मात्र रस्ता एवढा खराब होता की,गाडी 10च्या स्पीड ने सुध्दा चालवू शकत नव्हतो. त्यामुळे खुप वेळ लागत होता. कसं तरी करून आम्ही 5 कि.मी. गेलो असणार मात्र फोरव्हिलर पुढे नेणे आम्हाला योग्य वाटले नाही. त्यामूळे सर्वानुमते आम्ही फोरव्हिलर येथेच पार्क करून पायी जायचे ठरविले. साधारण 1.30 तासाची पायपीट करून सर्वजन  एका गावाजवळ येवून पोहचलो. बाईकने मात्र मी आणि उदय आधिच पोहचलो होतो. आत्ता मात्र आम्ही बाईक देखील येथेच लावून आम्ही सर्वजन पायीच राजमाची गडाच्या दिशेने निघालो. खरं तरं गाडी पुढे नेल्या असत्यातर अर्ध्यातासातच आम्ही गडावर पोहचणार होतो मात्र आत्ता आम्हाला अजून दोन तास तरी पायी  जावे लागणार होते. असो आलोच आहोत तर जाणारच होतो.


            हेंमत ने काल एक साप पकडलेला होतो (हरणटोळ) त्याला आम्ही सर्व प्रथम जंगलात सोडून दिला व पुढे निघालो. रस्त्याने पुर्णपणे चिखल व वाट निसरडी झालेली होती. मात्र रस्त्याने चिखल असल्यामुळे आमचा प्रवास खुपच संथ गतीने सुरू होता. किल्यापर्यंत पोहचेपर्यंत 12 वाजले होते.

             सरळ खांडीत न जाता. आम्ही प्रथम श्रीर्वधन गड बघायचे ठरवले व त्याप्रमाणे आम्ही गावाच्या दिशेने निघालो. गावत जाण्याआगोदर वनविभागाची एक चौकी आहे तेथे आलेल्या सर्व गडप्रेमींची नोंद केली जाते. तसेच गडावर जाण्यासाठी पर माणसी रू.10/- प्रमाणे शुल्क आकारले जाते. व प्रत्येकाला रीतसर पावती देखील दिली जाते. खरच चांगला उपक्रम आहे हा. अशा प्रकारचा उपक्रम प्रत्येक गडावर राबवावा. त्यामुळे आपल्या गडांना दररोज किती जन भेट देतात. याची नोंद देखील होते.
            गावात शिरल्यानंतर उजव्या बाजूची वाट पकडून गड चढण्यास सुरवात केली की पुढच्या 15 मिनटांतच आपण गडाच्या प्रवेशव्दारपाशी येवून पोहचतो. गडाचा दरवाजा भक्कम अशा बुरूजाने संरक्षीत केलेला आहे. तसेच गडाचा दरवाजा हा शत्रुला पटकन मिळु नये किंवा लक्षात येवू नये याची पुरेपुर काळजी घेतलेली दिसते. कारण समोरच उंच असा बुरूज आपल्या नजरेस पडतो व त्याच्या डाव्या बाजूनच दरवाजा असावा असे आपणास वाटत असते मात्र ती बाजू पुर्णपणे बदीस्त आहे. तसेच उजव्या बाजूने गेल्यास बुरूजाच्या गोलाकार बाजु संपते तेथेदेखिल दरवाजा दिसत नाही. तर तसेच थोडे पुढे चालत गेल्यास मुख्या दरवाजाकडे जाण्याचा रस्ता दिसतो. दरवाजाला बाहेरून उंच अशी दगडी तटबंधी घालून संरक्षीत केलेले आहे. बाहेरून बघितल्यास पटकन ल्क्षात न येणारा अशी मुख्यदरवाजाची रचना आहे.


         


   मुख्य दरवाजातून आत गेल्यास आत पाहरेक-यांच्या देवडया आहेत.
दरवाजातून आत गेल्यानंतर डाव्या बाजुने बुरजावर जाता येते. बुरूजावरून समोर अप्रतिम असे निसर्गसौंदर्य दिसते. बुरूज बघुन आल्यावाटेने दरवाजापर्यंत येवून दरवाजापासून उजव्या बाजूच्या तटबंदीच्या बाजूने गडाच्या फेरीला सुरूवात करावी. 





थोडे पुढे गेल्यानंतर एक गुहा आहे. गुहेत मात्र पाणी असल्यामुळे आत जाता येत नाही.





 या गुहेच्या थोडे पुढे जमिनीत अर्ध्यापर्यंत गाडली गेलेली एक कमान दिसते. हि कमान म्हणजे
पुर्वाभिमुख दरवाजा आहे. मात्र आतील बाजूने तो अर्धापर्यंत मातीत गाडला गेलेला आहे. तसेच आत दगड मातीचा खच पडलेला आहे. तटबंदीवरून दरवाजाची अर्धवतुळाकार दगडी भिंत दिसते. मुख्य दरवाजाप्रमाणे हे प्रवेशव्दार देखिल दगडीभिंतीने संरक्षीत केलेले आहे.








 प्रवेशव्दाराच्या वरच्या बाजुला पुढे एक मोठे पाण्याचे टाके आहे. 






पाण्याच्या टाक्यापासुन पुढे गेल्यास आपण गडाच्या पुर्व टोकाला जाऊन पोहचतो. येथुन सरळ वर पठारावर यावे. वर आल्यास एक पाण्याच टाके आहे. या टाक्याच्या थोडे पुढे एक पाण्याचा तलाव आहे. 









तलाव बघुन पुढे आल्यास आपण एका छत नसाणा-या वास्तुजवळ येवून पोहचतो. या वास्तुच्या कमानीवर गणेशमुर्ती कोरलेली आहे. तसेच एक वतुळाकार पूष्प कोरलेले आहे. आतमध्ये एका रांगेत चार कबरी सदृश चौकोनी बांधकाम असून त्याच्या मधोमध गोलाकार खडडे दिसुन येताता. याचे प्रयोजन काही केल्या समजत नाही. आणि शेवटी शिवपींड आहे. तसेच प्रवेशव्दाराच्या कमानीस कोनाडे आहेत.









 या वास्तुच्या उजव्या बाजूने सरळ चालत आल्यास दोन पाण्याची टाके आहेत. तसेच उजव्या बाजूच्या तटबंदीच्या बाजूने देखील पाण्याची टाके आहेत. 





येथुन पुढे मुख्या प्रवेशव्दाराकडे येताना एक टाके बांधलेले दिसते त्यात चुना कालवलेला आहे. मात्र हे टाके नंतरच्या कालखंडातील वाटते. या टाक्याच्या बाजुने आपण मुख्या प्रवेशव्दारापाशी येवून पोहचतो. येथेच आपली गडफेरी  पुर्ण होते.






                           
                              श्रीवर्धन गडाच्या मुख्या प्रवेशव्दारातून डाव्या बाजुने खाली उतरल्यास आपण दोन्ही गडांच्या मधल्या खिंडीत येवून पोहचतो. येथे हनुमानाचे बंधीस्त मंदीर असून मंदीराला दोन भागात पटांगन आहे. मंदीराच्या वरील चौथ-यावर उजव्या बाजूला एक तोफ एक विरगळ  आहे. तर डाव्या बाजूला दोन विरगळ व एक अर्धी तोफ आहे. समोरच तीन दिपमाळा आहेत तर एक अश्वमुर्ती आहे.

 येथुनच समोर म्हणजे मनरंजन गडावर जाण्यासाठी पाय-या दिसतात.या पाय-या आपल्याला गडावर घेवून जातात. 15 मिनटांतच आपण मुख्य प्रवेशव्दारापाशी येवून पोहचतो. 

मात्र प्रवेशव्दाराकडे नजाता डाव्या बाजून वर चढण्यास सुरवात करावी थोडयाच अतंरावर पडलेल्या तटबंधीतुन आपण गडावर प्रवेश करतो. कदाचीत येथे सुध्दा प्रवेशव्दार असावे मात्र आज त्याचे काहीच अवशेश शिल्लक नाहीत. वर चढुन गेल्यास समोरच आपल्याला तटबंधीची अर्धी भिंत नजरेस पडते. डाव्या बाजूला खाली बुरूज असून बुरूजावर भगवा फडकत आहे.


 बुरूज बघुन परत आल्या वाटेने सरळ वर मुख्य गडावर चढण्यास सुरवात करावी. समोरच गडावरील सर्वोच्च बुरूज नजरेस पडतो.


 
 बरुजाच्या खाली पोहचल्यास तेथेच दोन-तीन पाण्याची टाके आहेत. डोंगराच्या डाव्या बाजूने पुडे गेल्यास कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. या टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. येथुन पुढे गडावर जाण्यासाठी पाय-या आहेत. पाय-यांच्या दोन्ही बाजूस पाण्याची टाकी आहेत. 

पाय-यांच्या मार्गाने आपण मुख्या बुरूजावर येवून पोहचतो. 










या बुरजावरून खालील दोन्ही बुरूज आपले लक्ष वेधून घेतात. येथे एक पडकी वास्तु आहे. तसेच एक नवीन बांधकाम देखील आहे. या नवीन बांधकामाच्या बाजुने खाली उतरल्यास समोरील बुरूजावर आपण येवून पोहचतो. वाटेत दोन पाण्याची टाके आहेत. हा बुरूज दोन भाग आहेत. खालील भागात जाण्यासाठी बुरूजातूनच एक पाय-यांचा अरूंद असा रस्ता आहे. या पाय-यांनी आपण खालील बुरूजावर जाऊन पोहचतो. 








आल्यावाटेने पाय-याचढून परत बुरूजावर येता येते किंवा बाहेरील बाजूने देखील बुरूजावर येण्यासाठी रस्ता आहे.











            श्रीवर्धनची तटबंधी आणि बुरूज आजही ब-यापैकीं सुस्थितीत आहेत. संपुर्ण किल्ल्याला दुहेरी तटबंदी असावी असे आज अस्तीत्वात असणा-या अवशेषांवरून दिसते. तटबंदीवरून चालत चालत आपण गडाच्या मुख्य दरवाजापर्यंत येतो. 



वाटेत पाण्याची दोन मोठी टाकी आहेत.









  टांक्यांच्या थोडे पुढे एक गुहा आहे. या गुहेच्या चौकटीवर गणेशमुर्ती कोरलेली आहे.  ही गुहा म्हणजे दारूगोळयांचे कोठार . आज या गुहेत एक गावकरी गडावर येणा-या 
लोंकासाठी चहा 
नाष्टा बनवून देतो.  
                                                                                                                  
गुहेसमोरील रस्त्याने आपण गडाच्या मुख्य दरवाजापर्यंत येतो. दरवाजाची कमान आज देखील चांगल्या स्थितीत आहे. दरवाजाच्या बाजूलाच पहारेक-यांसाठी देवडया आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस अनेक दगडी घडीव चिरे अस्ताव्यस्त पडलेले आहेत. दरवाजातून बाहेर निघाल्यास समोरच खाली उतरणारा रस्ता आहे. येथेच आपली गड फेरी पुर्ण होते.











 -: समाप्त :-




Saturday, 7 April 2018

 राजधेर


 24 डिसेंबर सकाळी 8.30 
ला चहा नाष्टा करून रेनुका मातेचे दर्शन 

घेवून आम्ही राजधेर कडे निघालो.


अर्धा तासाच्या प्रवासानंतर आम्ही 

सर्वजन राजधेरवाडी गावात 

पोहचलो. राजधेरवाडी ग्रामपंचायत 

कार्यालयाच्या समोरूनच राजधेर 

गडावर जाण्यासाठी रस्ता आहे.

   राजधेरवाडीत पुन्हा एकदा किल्यासंबधी गडवाटच्या सदस्यांनी सुचना दिल्या व सुचना नंतर काऊंट घेण्यात आले व मग आमचा राजधेर  चढाईस सुरवात झाली. सुरवातीचाच रस्ता हा उभा चढ व घसा-याचा त्यामानाने सोपा पन दम काढणारा रस्ता आहे.


पहिला टप्पा पार केल्यानंतर आपण एका तलावाजवळ येवून पोहचतो. तलावाच्या उजव्या बाजूने आपण गडाच्या दिशेने मार्गक्रमन केल्यास अर्धातासात आपण गडाच्या सोंडेजवळ येवून पोहचतो.
 येथून डोंगराच्या डाव्या बाजूने चालत आल्यास आपण डोगरांत कोरलेल्या गुहांजवळ येवून पोहचतो या गुहांमध्ये गावातील लोंकांची गुरे राहतात. त्यामुळे या गुहा माणसांना राहण्यायोग्य नाहीत.







 येथुनच थोडे पुढे गेल्यास आपण एका लोंखंडी शीडीजवळ येवून पोहचतो. येथे पुर्वी गडावर जाण्यासाठी प्रवेशव्दार व कातळात कोरलेल्या पाय-या होत्या मात्र आज त्याचे काहीही अवशेष शिल्लक नाहीत. प्रवेशव्दाराची एक कमानीचा थेडासा भाग कातळाला लागून आपल्या अस्तीत्वाची शेवटची घटका मोजतोय हाच काय या प्रवेशव्दाराचा पुरावा शिल्लक आहे. याच ठिकाणी एक अस्पष्ट असा शिलालेख कोरलेला आहे.                           
             
                   येथेलावलेली लोंखंडी शिडी म्हणजे. एक दिव्यच समजायले हवे. आणि ज्याने ही सिडी लावली त्याचे आभार देखील मानावे कारण जर ही सीडी येथे नसेल तर सर्वसामान्य ट्रेकर्सना या गडावर जाताच येणार नाही. कारण वर जाण्यासाठी प्रस्तारोहणाचे तंत्र वापरावे लागेल. सीडी ब-याच ठिकाणी तुटलेली आहे ती तुटलेल्या ठिकाणी दोरीने बांध्ण्यात आली आहे. त्यामुळे वर चढतांना सावकाश व एका-एकानेच वर चढून जावे. घाई करूनये अन्यथा सिडी तुटून मोठा अपघात होऊ शकतो.
      सीडी चढून आपण गडावरील पहिल्या उधवस्त प्रवेश्दारातून गडावर प्रवेश करतो. खरे तर हे गडाचे दुसरे प्रवेशव्दार आहे मात्र पहिले प्रवेश्व्दार आज अस्तीत्वातच नसल्यामुळे हेच पहिले प्रवेशव्दार होय. या प्रवेश्व्दारचे देखील एकाच बाजुचे खांब आज अस्तीत्वात आहेत. येथून गडावर जाण्यास कातळात खोदलेल्या पाय-या आहेत. 

                                                                      

एका बाजूला खोल दरी तर दुस-या बाजूला कातळ आहे. या कातळात दोन गुहा खेदलेल्या आहेत. 

        पाय-यांनी चढून वर आल्यास दोन वाटा लागतात एक वाट उजवीकडे तर दुसरी वाट डावीकडे जाते. प्रथम उजवीकडची वाट पकडून चालायला 

लागल्यास समोरच आपण एका वाडयाजवळ येवून पोहचतो. 

वाडयाचे   


 बांधकाम आजही 

चांगल्या स्थितीत आहे
 येथे या वाडयाखेरीज 
दुसरी कोणतीही वास्तु अस्तीत्वात नाही.
   वाडयाच्या समोरच गडाच्या टोकावर एक ध्वज उभा आहे.              
        
  येथुन समोरचा परिसर खुप सुंदर दिसतो. तसेच येथे उजव्या बाजूला एक बुरूज बांधलेला दिसतो. डोंगराची माती ढासळू नये यासाठी याचे प्रयोजन असावे.



येथुन परत मागे फिरून मागे आल्यास मुख्य रस्त्याच्या वरच्या बाजूला दोन गुहा आहेत यात एका गुहेत उतरण्यासाठी सिडी लावलेली आहे. त्यात एक बाबा राहतात.
   
     
 येथुन खाली उतरून आल्यास 

समोरच दगडी  बांधकाम आहे
 त्यात एक कबर असून त्या कबरीस पांढरा रंग दिलेला आहे. 




परत डाव्या वाटेने चालत गेल्यास 

समोरच एक छत असलेले टाके आहे







       येथुन पुढे गेल्यास पुन्हा कातळात कोरेलेले पाण्याचे मोठे टाके आहे. या  टाक्यातील पाणी पिण्यास येाग्य आहे.



येथुन पुढे 

गेल्यास 

आपण एका 

मोठया 
तलावापासीयेवून पोहचतो. तलावाच्या एका                             बाजूला  कातळात शिव मंदीर आहे.


 येथुन सरळ वर गेल्यास आपण गडाच्या माथ्यावर पोहचतो. पंरतू गडाच्या माथ्यावर न जाता डाव्या बाजूने सरळ चालत गेल्यास आपण गडाच्या दुस-या टोकावर पोहचतो. 



 येथून माथ्याकडे चढत गेल्यास एके ठिकाणी कातळात पाय-या खेदलेल्या पहावयास मिळतात.





 येथुन गड माथ्यावर आल्यास एक पडकी वास्तू पहावयास मिळते







 
या वास्तुच्या एका उजव्या बाजूला एक पाण्याचे टाके आहे तर डाव्या बाजूला  एक पाण्याचे टाके आहे. टाक्यांतील पाणी स्वच्छ आहे.




या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य 

आहे.







  डाव्या बाजून खाली उतरल्यास आपणास दोन पाण्याची टाकी  पहावयास मिळतात  याटाक्यांचे वैशीष्टय म्हणजे ही दोन्ही टाकी इग्रंजी टी T आकाराची आहेत. बहुतेक टाक्यातील अधिकचे पाणी वाहून जाण्यासाठी अशी रचना केली गेली असावी.

 या टाक्याच्या वरील बाजूस एक अपुर्ण अवस्थेतील T आकाराचे पाण्याचे टाके आहे.





येथुन खाली उतरत गेल्यास
सहा सात  पाण्याच्या टाक्यांचा  समुह पाहवायास मिळतो. या पैकीं दोन टाक्यांमध्ये पाणी आहे  मात्र इतर पाच टाक्यांत  पाणी नाही तसेच ही टाकी जवळ जवळ दगड-मातीने भरत आलेली आहेत.
 हे सर्व अवशेष बघून झाल्यानंतर आपण परत मुख्या रस्त्यापर्यंत येतो येथे आपली संपूर्ण गडफेरी पुर्ण होते. गडमाथ्यावरून मांगीतुंगी, न्हावीगड, कोळथेर, इंद्राई, धोडप असा सर्व परिसर दिसतो.

                        -: समाप्त :-


राजधेर किल्लयावर मी ज्या वाटेने फिरलो त्याचा मॅप रूट ची लींक
https://www.ramblr.com/web/mymap/trip/397305/935554/


चावंड – प्रसन्नगड             23 जून 2019 चांवड करायचा असे ठरले होते. सकाळी 8.00 वाजता माळशेज घाट पार करून गणेश खिंड चढत असतांना ...