राजमाची ट्रेक चा प्लान जवळ-जवळ महिन्याभरापासून
तयार होता. 29जून 2018 ला शनिवारी कोंढाना मार्गे राजमाची करावयचे ठरले होते मात्र
शनिवारी अचानक प्लान रद्द करावा लागला. व दुस-यादिवशी रविवार लोनावळा मार्गे जायचे
ठरले. रविवार सकाळपर्यंत अजुन एक जन कॅन्सल झाला. मात्र ठरल्याप्रमाणे रविारी सकाळी
5.30 वाजता निघायचे ठरविले. ठरल्याप्रमाणे 5.30 चे 6.30 वाजले. एक फोरव्हिलर व एक बाईक
आणि आम्ही सात जन राजमाचीकडे रवाना झालो. बाईक वर मी व उदय, तसेच गाडीमध्ये युवराज,
परशुराम, बंटी, संदीप व हेमंत असे सात जन राजमाची कडे रवाना झालो.
उल्हास नदीच्या खो-यात लोनावळयापासून
15 कि.मी.अंतरावर राजमाची किल्ला आहे. या किल्याचे दोन भाग आहेत दोन भाग म्हणन्यापेक्षा
दोन स्वतंत्र किल्लेच आहेत. बालेकिल्ला व मुख्य किल्ला असून बालेकिल्याला श्रीवर्धन
गड तर मुख्य किल्याला मनरंजन गड असे म्हणतात. भौगोलीक दृष्या या किल्याचे महत्व अधिक
होते कारण बोरघाटमार्गे पुण्याकडे जाण्याच्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व
जकात वसुलीसाठी अनेक किल्यांचा वापर होत असे त्यातीलच एक महत्वाचा किल्ला आहे.
कल्याणच्या 1657 च्या स्वारीनंतर त्याच वर्षी शिवाजीमहाराजांनी पुणे आणि कल्याण मार्गावरील
बोरघाटातील राजमाची हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. पुढे संभाजी महाराज जिवंत
असेपर्यंत म्हणजे 1689 पर्यंत हा किल्ला स्वराज्यातच होता. पुढे 1713 मध्ये शाहुमहाराजांनी हा किल्ला कान्होजी आंग्रेना दिला.
नतंर 1730 मध्ये पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे हा किल्ला आला. पुढे 1818 मध्ये किल्ला
इंग्रजांकडे गेला.
जेमतेम 8.30 वाजता
आम्ही कर्जत ला घाट सुरू होण्याआगोदर चहा नाष्टा करून लोनावळा मार्गे राजमची कडे निघालो.
मात्र मेन रोड सोडून आत निघालो तोच 2 किलोमीटर च्या पुढे जेमतेम गेलो असणार मात्र रस्ता
एवढा खराब होता की,गाडी 10च्या स्पीड ने सुध्दा चालवू शकत नव्हतो. त्यामुळे खुप वेळ
लागत होता. कसं तरी करून आम्ही 5 कि.मी. गेलो असणार मात्र फोरव्हिलर पुढे नेणे आम्हाला
योग्य वाटले नाही. त्यामूळे सर्वानुमते आम्ही फोरव्हिलर येथेच पार्क करून पायी जायचे
ठरविले. साधारण 1.30 तासाची पायपीट करून सर्वजन
एका गावाजवळ येवून पोहचलो. बाईकने मात्र मी आणि उदय आधिच पोहचलो होतो. आत्ता
मात्र आम्ही बाईक देखील येथेच लावून आम्ही सर्वजन पायीच राजमाची गडाच्या दिशेने निघालो.
खरं तरं गाडी पुढे नेल्या असत्यातर अर्ध्यातासातच आम्ही गडावर पोहचणार होतो मात्र आत्ता
आम्हाला अजून दोन तास तरी पायी जावे लागणार होते. असो आलोच आहोत तर जाणारच होतो.
हेंमत ने काल एक
साप पकडलेला होतो (हरणटोळ) त्याला आम्ही सर्व प्रथम जंगलात सोडून दिला व पुढे निघालो.
रस्त्याने पुर्णपणे चिखल व वाट निसरडी झालेली होती. मात्र रस्त्याने चिखल असल्यामुळे
आमचा प्रवास खुपच संथ गतीने सुरू होता. किल्यापर्यंत पोहचेपर्यंत 12 वाजले होते.
सरळ खांडीत न जाता. आम्ही प्रथम श्रीर्वधन गड बघायचे ठरवले व त्याप्रमाणे
आम्ही गावाच्या दिशेने निघालो. गावत जाण्याआगोदर वनविभागाची एक चौकी आहे तेथे आलेल्या
सर्व गडप्रेमींची नोंद केली जाते. तसेच गडावर जाण्यासाठी पर माणसी रू.10/- प्रमाणे
शुल्क आकारले जाते. व प्रत्येकाला रीतसर पावती देखील दिली जाते. खरच चांगला उपक्रम
आहे हा. अशा प्रकारचा उपक्रम प्रत्येक गडावर राबवावा. त्यामुळे आपल्या गडांना दररोज
किती जन भेट देतात. याची नोंद देखील होते.
गावात शिरल्यानंतर
उजव्या बाजूची वाट पकडून गड चढण्यास सुरवात केली की पुढच्या 15 मिनटांतच आपण गडाच्या
प्रवेशव्दारपाशी येवून पोहचतो. गडाचा दरवाजा भक्कम अशा बुरूजाने संरक्षीत केलेला आहे.
तसेच गडाचा दरवाजा हा शत्रुला पटकन मिळु नये किंवा लक्षात येवू नये याची पुरेपुर काळजी
घेतलेली दिसते. कारण समोरच उंच असा बुरूज आपल्या नजरेस पडतो व त्याच्या डाव्या बाजूनच
दरवाजा असावा असे आपणास वाटत असते मात्र ती बाजू पुर्णपणे बदीस्त आहे. तसेच उजव्या
बाजूने गेल्यास बुरूजाच्या गोलाकार बाजु संपते तेथेदेखिल दरवाजा दिसत नाही. तर तसेच
थोडे पुढे चालत गेल्यास मुख्या दरवाजाकडे जाण्याचा रस्ता दिसतो. दरवाजाला बाहेरून उंच
अशी दगडी तटबंधी घालून संरक्षीत केलेले आहे. बाहेरून बघितल्यास पटकन ल्क्षात न येणारा
अशी मुख्यदरवाजाची रचना आहे.
मुख्य दरवाजातून आत गेल्यास आत पाहरेक-यांच्या देवडया आहेत.
दरवाजातून आत गेल्यानंतर डाव्या बाजुने बुरजावर जाता येते. बुरूजावरून समोर अप्रतिम असे निसर्गसौंदर्य दिसते. बुरूज बघुन आल्यावाटेने दरवाजापर्यंत येवून दरवाजापासून उजव्या बाजूच्या तटबंदीच्या बाजूने गडाच्या फेरीला सुरूवात करावी.


थोडे पुढे गेल्यानंतर एक गुहा आहे. गुहेत मात्र पाणी असल्यामुळे आत जाता येत नाही.

या गुहेच्या थोडे पुढे जमिनीत
अर्ध्यापर्यंत गाडली गेलेली एक कमान दिसते. हि कमान म्हणजे

प्रवेशव्दाराच्या वरच्या बाजुला पुढे एक मोठे पाण्याचे टाके आहे.
पाण्याच्या टाक्यापासुन पुढे गेल्यास आपण गडाच्या पुर्व टोकाला
जाऊन पोहचतो. येथुन सरळ वर पठारावर यावे. वर आल्यास एक पाण्याच टाके आहे. या टाक्याच्या
थोडे पुढे एक पाण्याचा तलाव आहे. 
तलाव बघुन पुढे आल्यास आपण एका छत नसाणा-या वास्तुजवळ येवून पोहचतो. या वास्तुच्या कमानीवर गणेशमुर्ती कोरलेली आहे. तसेच एक वतुळाकार पूष्प कोरलेले आहे. आतमध्ये एका रांगेत चार कबरी सदृश चौकोनी बांधकाम असून त्याच्या मधोमध गोलाकार खडडे दिसुन येताता. याचे प्रयोजन काही केल्या समजत नाही. आणि शेवटी शिवपींड आहे. तसेच प्रवेशव्दाराच्या कमानीस कोनाडे आहेत.


या वास्तुच्या उजव्या बाजूने सरळ चालत आल्यास दोन पाण्याची टाके आहेत. तसेच उजव्या बाजूच्या तटबंदीच्या बाजूने देखील पाण्याची टाके आहेत.

येथुन पुढे मुख्या प्रवेशव्दाराकडे येताना एक टाके बांधलेले दिसते त्यात चुना कालवलेला आहे. मात्र हे टाके नंतरच्या कालखंडातील वाटते. या टाक्याच्या बाजुने आपण मुख्या प्रवेशव्दारापाशी येवून पोहचतो. येथेच आपली गडफेरी पुर्ण होते.

श्रीवर्धन गडाच्या मुख्या प्रवेशव्दारातून डाव्या बाजुने खाली उतरल्यास आपण दोन्ही गडांच्या मधल्या खिंडीत येवून पोहचतो. येथे हनुमानाचे बंधीस्त मंदीर असून मंदीराला दोन भागात पटांगन आहे. मंदीराच्या वरील चौथ-यावर उजव्या बाजूला एक तोफ एक विरगळ आहे. तर डाव्या बाजूला दोन विरगळ व एक अर्धी तोफ आहे. समोरच तीन दिपमाळा आहेत तर एक अश्वमुर्ती आहे.
येथुनच समोर म्हणजे मनरंजन गडावर जाण्यासाठी पाय-या दिसतात.या पाय-या आपल्याला गडावर घेवून जातात. 15 मिनटांतच आपण मुख्य प्रवेशव्दारापाशी येवून पोहचतो.
मात्र प्रवेशव्दाराकडे नजाता डाव्या बाजून
वर चढण्यास सुरवात करावी थोडयाच अतंरावर पडलेल्या तटबंधीतुन आपण गडावर प्रवेश करतो.
कदाचीत येथे सुध्दा प्रवेशव्दार असावे मात्र आज त्याचे काहीच अवशेश शिल्लक नाहीत. वर
चढुन गेल्यास समोरच आपल्याला तटबंधीची अर्धी भिंत नजरेस पडते. डाव्या बाजूला खाली बुरूज
असून बुरूजावर भगवा फडकत आहे.
बुरूज बघुन परत आल्या वाटेने सरळ वर मुख्य गडावर चढण्यास सुरवात करावी. समोरच गडावरील सर्वोच्च बुरूज नजरेस पडतो.

बरुजाच्या खाली पोहचल्यास तेथेच दोन-तीन पाण्याची टाके आहेत. डोंगराच्या डाव्या बाजूने पुडे गेल्यास कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. या टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. येथुन पुढे गडावर जाण्यासाठी पाय-या आहेत. पाय-यांच्या दोन्ही बाजूस पाण्याची टाकी आहेत.
पाय-यांच्या मार्गाने आपण मुख्या बुरूजावर येवून पोहचतो.
या बुरजावरून खालील दोन्ही बुरूज आपले लक्ष वेधून घेतात.
येथे एक पडकी वास्तु आहे. तसेच एक नवीन बांधकाम देखील आहे. या नवीन बांधकामाच्या बाजुने
खाली उतरल्यास समोरील बुरूजावर आपण येवून पोहचतो. वाटेत दोन पाण्याची टाके आहेत. हा
बुरूज दोन भाग आहेत. खालील भागात जाण्यासाठी बुरूजातूनच एक पाय-यांचा अरूंद असा रस्ता
आहे. या पाय-यांनी आपण खालील बुरूजावर जाऊन पोहचतो. 
आल्यावाटेने पाय-याचढून परत बुरूजावर येता येते किंवा बाहेरील बाजूने देखील बुरूजावर येण्यासाठी रस्ता आहे.
श्रीवर्धनची तटबंधी आणि बुरूज आजही ब-यापैकीं सुस्थितीत आहेत. संपुर्ण किल्ल्याला दुहेरी तटबंदी असावी असे आज अस्तीत्वात असणा-या अवशेषांवरून दिसते. तटबंदीवरून चालत चालत आपण गडाच्या मुख्य दरवाजापर्यंत येतो.

वाटेत पाण्याची दोन मोठी टाकी आहेत.


टांक्यांच्या थोडे पुढे एक गुहा आहे. या गुहेच्या चौकटीवर गणेशमुर्ती कोरलेली आहे. ही गुहा म्हणजे दारूगोळयांचे कोठार . आज या गुहेत एक गावकरी गडावर येणा-या
नाष्टा बनवून देतो.
गुहेसमोरील रस्त्याने आपण गडाच्या मुख्य दरवाजापर्यंत येतो. दरवाजाची कमान आज देखील चांगल्या स्थितीत आहे. दरवाजाच्या बाजूलाच पहारेक-यांसाठी देवडया आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस अनेक दगडी घडीव चिरे अस्ताव्यस्त पडलेले आहेत. दरवाजातून बाहेर निघाल्यास समोरच खाली उतरणारा रस्ता आहे. येथेच आपली गड फेरी पुर्ण होते.

गुहेसमोरील रस्त्याने आपण गडाच्या मुख्य दरवाजापर्यंत येतो. दरवाजाची कमान आज देखील चांगल्या स्थितीत आहे. दरवाजाच्या बाजूलाच पहारेक-यांसाठी देवडया आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस अनेक दगडी घडीव चिरे अस्ताव्यस्त पडलेले आहेत. दरवाजातून बाहेर निघाल्यास समोरच खाली उतरणारा रस्ता आहे. येथेच आपली गड फेरी पुर्ण होते.

-: समाप्त :-























No comments:
Post a Comment