Thursday, 9 November 2017

मोहनदर (शिडका) 

मोहनदर (शिडका) हा किल्ला आपले पटकन लक्ष वेधून घेतो तो त्यावरील खिडकी सारख्या नेढयामुळे.










          आईवडलांबरोबर ज्या-ज्या वेळी संप्तशुंगी गडावर दर्शनाला जात असे त्या - त्या वेळी गडावरून समोर दिसणा-या डोंगरांतील होल (नेढे) माझ्यासाठी खुप आर्कषणाचा विषय असे. त्याच्याकडे बघितले की नेहमी प्रश्न पडायचा की या डोंगरांला एवढा मोठा होल कोणी आणि कसा पाडला असेल. तेथे जाण्याची इच्छा तेव्हापसुनची परंतु ती पुर्ण करण्यासाठी वयाची पस्तीशी गाठावी लागली. आणि तो दिवस आला दि.01/10/2017 .
            दस-याचा दुसरा दिवस सकाळी 5.00 वाजता निघायचे ठरवले होते. खरं तर या वेळी ठरवले होते की, कोणी नाही आले तरी उदय आणि मी आम्ही दोघे जाणारच होतो. मात्र अदल्या दिवशी आमची पुर्ण टीमच तयार झाली पाच जणांची. मी, उदय, भाई , युवराज आणि अंकुश. 

           नेमीप्रमाणे युवराज सर्वाच्या लेट निघतो व प्रवासाला उशिर होतो म्हाणुन उदय आणि भाई यांनी त्याला निघण्यासाठी सकाळी 4 चा टाईम दिला होता. व मला त्यांनी मेसेज  करून सांगून ठेवले होते की, सकाळी पाच वाजता निघयचे आहे .

            त्यामुळे मी पहाटे चार वाजता उठलो तर या भावाची अंघोळ आटपून देवपुजा पण सुरू होती. मनातल्या मनात म्हटले आज याने खुपच मनावर घेतले वाटते. लवकर निघायचे. तितक्यात उदय चा फोन आला युवराजला उठव पहिले. मात्र त्याला सांगीतले की. तो आधिच उठुन तयार झाला आहे. हा उदयसाठी एक सुखद धक्काच होता. मग काय पटापट आटपून कॅमेराची बॅग घेवून पाच वाजता बरोबर गाडी काढली मात्र नेहमीप्रमाणे कोणीतरी उशीर करणारच आणि या वेळी तो मान आमचे मित्र भाई यांच्याकडे गेलेला होता. कारण ते पाच वाजता उठलेले. आणि येथुन पुढे त्यांचा सगळा क्रम सुरू होणार होता. असो पुढच्या पाच मिनटात उदय ठरलेल्या ठिकाणी येवून पोहचला त्याच्या पाठोपाठ अंकुशपण आला. आता आमच्याकडे वाट पाहण्याचे काम तेवढे होते. बरोबर अर्ध्यातासाने भाई आला. आणि आमची मोहनदरा शिडका ट्रेकला सुरवात झाली. 


गाडी आसनगावच्या पेट्रोल पंपावर लावली. पेट्रोल भरेपर्यंत मस्त एक सेल्फी काढला. आणि पुढील प्रवासाला सुरवात झाली. 









              
        संपूर्ण प्रवासात एकच विषय अधिक चर्चेचा होता तो म्हणजे युवराज आज सर्वांच्या आधि तयार झाला हा.


 नांदूरी रस्तयावर काढलेले फोटो.
                                                                                              

जवळ जवळ सकाळी 9.30 वाजता आम्ही नांदूरी गावात पोहचलो. नेहमीप्रमाणे खाण्यासाठी थोडेफार घेऊन आमची गाडी समोरच दिसणा-या गडाच्या दिशेने निघाली.



नांदुरी गावातुन लेप्ट मारल्यांनतर 3.50 KM. वर मोहनदरी फाटा आहे. 












मोहनदरी फाटयावर डाव्या बाजूला पाच सहा विरगळ आहेत.













           जवळ जवळ 10.00 वाजता आम्ही मोहनदरी गावातील आश्रम शाळेच्या बाजूला असणा-या गावातीलच एका गावक-याने आपल्या गुरांना बसण्यासठी बांधलेल्या शेड खाली आम्ही आमची गाडी पार्क केली व आमच्या बॅगा घेवून गडाच्या दिशेना निघणार तितक्यात गावातील शाळेत जाणारी मुले आमच्या जवळ आली व म्हणू लागली की आम्ही पण येतो  तुम्हाला किल्ला दाखवण्यासाठी वर मात्र त्या लहान लहान मुलांना नाही सांगून त्यांच्याकडून वर जाणारा रस्ता कोणता हे विचारले त्यांच्याबरोबर  एक फोटो काढला व त्यांनी सांगीतलेल्या वाटेने चालू लागलो. 




मोहनदर गावातील मुलांबरोबर एक फोटो












 मोहनदर गावातून दिसणारा मोहनदर किल्ला
















          नेहमी प्रमाणे रस्ता चुकणे हा आमचा स्थायी भावाप्रमाणे सुरवातच चुकीच्या रस्तयाने कली आणि खालून जोर जोरात आवाज येवू लागले. रस्ता चुकला रस्ता चुकला मागे बगितले तर तीच मगाची मुले अजुनही गाडीजवळच घुटमळत आम्हाला आवाज देत होती. त्यांच्या हातवारेंच्या इशा-यावरून आम्ही आमचा मार्ग बदलला व चढाईला सुरवात केली.
            आम्ही डोंगरांच्या समोरील सोंडेवरच चढाईला सुरूवात केली. रस्ता बराच घसा-याचा होता. कारण आम्ही आमच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे समोर डोंगर नजरेच्या टप्यात ठेवून चढाई करेणे. थेाडे वर गेल्यावर उजव्या बाजूला वळून प्रचलीत गडावर जाण्याच्या रस्तयाने आम्ही कातळ कडयापर्यंत पोहचलो. आणि नक्की कोणत्या बाजूने जायचे हेच लक्षात येत नव्हते कारण गवत खूप वाढल्यामुळे रस्ता असा दिसतच नव्हता.  खरं तर कातळकडा डाव्या बाजूला व दरी उजव्या बाजूला ठेवून समोरील किल्ला व किल्याच्या बाजूचा डोंगर यामधल्या घळीत (नळीत) पर्यंत जायचे होते. मात्र आम्ही डोंगर उजव्या बाजूला व दरी डाव्या बाजूला ठेवून नेढयाच्या दिशेने प्रवासाला सुरवात केली. आणि नको तेच झाले अर्धा डोंगर पार करून आल्यानंतर पुढे जाण्यासाठी रस्ताच नव्हता. तसेच खाली उतरावे म्हटले तर ते देखील शक्य नव्हते. मग परत मागे फिरायचे ठरवले. मागे  फिरून परत डोंगराच्या सोंडेपर्यंत येवून डोंगर डाव्या बाजूला व दरी उजव्या बाजूला ठेवत कातळ कडा व बाजूचा डोंगर यांच्या मधल्या घळीत पाचच मिनटांत पोहचलो घळीतुन वर गेल्यानंतर डाव्या बाजूने आपण किल्याच्या माथ्यावर पोहचतो. किल्याचा माथा प्रशस्त आहे. मात्र किल्याच्या पठारावर चार पाच टाक्यांचा समुह आहे. त्यातील दोन टाकी बुजलेली आहेत तर तिन टाक्यांमध्ये पासाळयात पूर्ण पणे पाण्याने भरलेल्या असतात. यामध्ये गावातील इतर गुरे चारायला आलेली मुले अंघोंळ करत होती. गड माथ्यावरून समोरच संप्तशुगी गड तसेच धोडप किल्ला नजरेस भरतो.



                                                                     धोडप किल्ला 







पाण्याने भरलेल्या चार पाच टाक्यांचा समुह





 पठारावरून दिसणारे  मोहनदर गावातील आश्रमशाळा

           पठार पाहून झाल्यानंतर परत घळीच्या दिशेने खली उतरावे व तसेचे डोंगराच्या कडे-कडेने नेढयाच्या दिशेने चालत निघावे. मात्र सप्टेंबर महिना असल्याकारणाने संपूर्ण डोंगरावर गवताचे साम्राज्य पसरलेले होते. तसेच या वाटेने कोणी गेलेले नसल्याकारणाने वाट देखील स्पष्ट दिसत नव्हती. वाट पूर्णपणे गुरतुल्याचे(टनटनी) झाडांनी झाकली गेली होती. परंतू नेढे तर बघायचे होतेच म्हणून नेमकी वाट पकडून 
खाली बसून त्या गुरतुल्याच्या झाडीतून वाट काढत पुढे निघालो. थोडे अंतर पार केल्यानंतर झाडी संपली व आम्ही परत कातळ कडयाला लागलो. व थेाडयाच वेळात आम्ही नेढयाजवळ पोहचलो.
            नेढे म्हणजे  अप्रतीम निसर्गाची किमयाच येथे आल्यानंतर संपूर्ण शरीरचा क्षीन निघून गेला नाही तर नवलच. मग काय ते अप्रतीम सौंदर्या आम्ही आमच्या कॅमे-यात टिपण्यास सुरवात केली. त्याला कारण ही तसेच होते. कारण आज आमच्याजवळ दोन डीएसएलआर होते. जो तो पोज देवून फोटो काढण्यात रंगून गेले.                                                                                                                                                      पठारावरून दिसणारे मोहनदर गाव 







            नेढयात वर चढून आम्ही सर्वजन आरामात बसलो. खालून येणारा वारा म्हणजे अप्रतीमच. तसेच मोहनदरी गावातील आश्रम शाळेच्या मागून वर येणारा रस्ता स्पष्ट पणे दिसत होता. आता याच रस्तयाने खाली जायचे असे ठरवून आम्ही नेढयातूनच खाली उतरायचे ठरविले. खर तर खाली अतरायचे म्हणजे जरा कठीनच होते. कारण एव्हाना दुपारचे 12 वाजून गेले होते. वर सुर्य देव आपली कृपादृष्टी राखून होते त्यामुळे संपूर्ण कातळ कडा तळपूण निघालेला होता. युवराज खाली उतरला खरा परंतू हात व पायांना चटके बसल्यामुळे तो पळतच गवतावर जाऊन उभा राहिला. मात्र आम्ही सगळे त्याला हसत होतो खरे पण त्याच्यानंतर आमची देखील तीच त-हा होणार होती.



            आम्ही सगळे जन सुरक्षीतपणे एकमेकांना सवारत आधार देत सवकाशपणे खाली उतरलो. कारण तेथुन उतरण्यासाठी प्रस्तारोहनाचे तंत्र अवलंबावे लागते. तसेच 15-20 फुटी रोप लागतो, असे मी वाचले होते. आणि आम्ही कुठल्याही साधनाचा वापर न करताच खाली उतरलो. (टीप :- असे साहस जमल्यास कोणी करू नये. कारण एखादी चुक आपल्या जीवावर बेतु शकते) त्या नेढयाला निरोप दिला. निसर्गाचा एक अविस्कार डोळयात सामाऊन घेत आम्ही परतीच्या प्रवासाला सुरवात केली.

टीप :- गडावर जाण्यास उत्तम कालावधी नोव्हेंबर ते मार्च
             पावसाळयात गडावर जाणे टाळावे कारण गवत वाढलेले असते. रस्ता दिसत नाही तसेच वाट निसरडी आहे. तसेच अपरीचीत किल्ला असल्याकारणाने सहसा गडावर कोणी जात नाही.
नंढयाबद्दल ची दंतकथा :- या नेढयाबद्दल या भागातील गावकरी एक दंतकथा सांगतात. ती अशी की. एकदा महिषासुर या राक्षसाने आणि त्याच्या दोन भावांनी वणी परीसरात उच्छाद मांडला होता. तेव्हा सप्तश्रृंगी देवीने महषासुराच्या दोन्ही भावांचा वध केला त्यानंतर देवी महिषासुराचा वध करण्यासाठी त्याच्या पाठीमागे लागली असता., महिषासुराने रेडयाचे रूप घेऊन पळायला सुरवात केली. पळता-पळता मषिासुर मोहनदरीचा डोंगर पार करून तो पलीकडे गेला. त्याच्या मागोमाग जाणा-या देवीने डोंगराला लाथ मारल्यामुळे हे नेढे तयार झाले. तसेच काही जन असेही सांगतात की देवीने बाण मारल्यामुळे हे नेढे तयार झालेले आहे.

            मात्र लाव्हा रसापासुन सहयाद्रीची निर्मीती होतांना काही ठिसुळ भागही निर्माण झाले. वा-या आणि पावसामुळे अशा ठिसुळ भांगांची झीज  होते. झीज झाल्यामुळे ठिसुळ भाग खाली पडतो व कठीन भाग तसाच राहतो. आणि त्या ठिकाणी  कातळकडयाला आरपार भोक पडत. त्यालाच नेढे असे म्हटले जाते. तसेच दगडांच्या मधला ठिसुळ भाग ज्या प्रमाणात असेल तेवढा नेढयाचा आकार असतो. 

नसिर्ग एका नवीन नेढयाच्या तयारीत 








                                                                           -: समाप्त :-

















No comments:

Post a Comment

चावंड – प्रसन्नगड             23 जून 2019 चांवड करायचा असे ठरले होते. सकाळी 8.00 वाजता माळशेज घाट पार करून गणेश खिंड चढत असतांना ...