Wednesday, 22 April 2020



चावंड – प्रसन्नगड

            23 जून 2019 चांवड करायचा असे ठरले होते. सकाळी 8.00 वाजता माळशेज घाट पार करून गणेश खिंड चढत असतांना अनपेक्षीतपणे अचानक उदय भेटला. आणि अचानक ठरलेला प्लान चेंज करून चांवड व हडसर खिळयाच्या वाटेने करायचा असे ठरविले. उदयची बाईक जवळच्याच गावातील एका घराच्या बाजूला  लावून आम्ही दोघे माझ्या बाईकने चांवड कडे निघालो. सकाळी 9.00 वाजता चांवड किल्लयाच्या पायथ्याला बाईक लावून आम्ही गड चढायला सुरवात केली. गडावर संवर्धनाचे चांगलेच काम झाल्यामुळे पायथ्यापासूनच गडावर जाण्यासाठी दगडी पाय-या आहेत.
दगडी पाय-या


पाय-यांनी आपण 15 मिनटातच आपण गडाच्या रेलींग बसविलेल्या ठिकाणी येवून पोहचतो. या ठिकाणच्या पाय-या सुरूंग लावून उध्वस्त केलेल्या आहेत. हा देखील इग्रजांचाच एक उपद्रव येथे देखील दिसुन येतो. रेलींग लावण्या आगोदर गडावर जाण्यासाठी तार लावलेली होती ती आज देखील आहे मात्र रेलींग लावल्यामुळे गडावर जाण्याचा रस्ता सोपा झालेला आहे.
अरूंद पाय-यांचा मार्ग     
या अरुंद पाय-या चढून वर गेल्यावर समोरच एक प्रश्स्त पाय-यांचा राजामर्ग लागतो. या पाय-या जवळ-जवळ तीन मीटर रूंद असून एका समान अंतरावर असल्यामुळे हा पाय-यांचा रस्ता बघण्यासारखा आहे.  या पाय-यांचे घडीव चिरे बसविलेले आहेत मात्र या चि-यांच्या मधील माती पुर्णपणे निधून गेलेली आहे.



पाय-यांचा राजामर्ग
            या पाय-यांनी  वर चढत गेल्यास अपण तटबंधीजवळ कातळात कोरलेल्या दरवाजात येवून पोहचतो. मात्र दरवाजाच्या थोडे अलिकडे डाव्या बाजूला एक कातळात खोदलेली विहीर आहे.
बुजलेली विहीर  

 मात्र सदर विहीर बुजलेली तसेच आत पाला पाचोळा पडलेला आहे. विहीर बघुन परत पाय-यांच्या मार्गाने आपण किल्याच्या मुख्या दरवाजात येवून पोहचतो. 

















कातळात कोरलेली गणेश मुर्ती

दरवाजात पोहचताच प्रथम दर्शनी आपले लक्ष वेधून घेतो तो म्हणजे कातळात कोरलेली गणेश मुर्ती काळाच्या ओघत लुप्त होत चाललेली आहे.
मुख्य दरवाजा 

 आपल्या डाव्या बाजूस मुख्य दरवाजा लागतो दरवाजाच्या वर देखील एक गणेशमुर्ती कोरलेली आहे. मुख्य दरवाजाचे चिरे आता सुटे लागले आहेत. त्यामुळे वरील चौकटीला लोंखडी पाईपने आधार दिलेला आहे. याच्या पुढील चौकट मात्र आज देखील व्यवस्थीत टिकून आहे. एकही दगड न निखळता. खरच हे दगडी बांधकाम करणा-या कामगारांचे  करावे तितके कौतुक कमीच पडेल. त्यांच्या कौशल्याला मानाचा मुजरा. 





या प्रवेशव्दारातुन  दहाच  पाय-या चढून आपण गडावर प्रवेश करतो. येथुन अजून काही पाय-या चढून वर गेल्यास आपण अनेक इमारतींच्या पडक्या अवशेशांजवळ येवून पोहचतो.




सदरेकडे जाणारा रस्ता












येथे पुर्वी सदर होती असे येथील अवशेषांवरून जाणवते. येथेच बसून मुलकी कारभार पाहीला जात असे. सदरेच्या उजव्या बाजूची वाट चामुंडा देवीच्या मंदीराकडे जाते तर समोरची वाट आपल्याला एका मोठया पुष्करर्णी जवळ घेवून जाते. गडाच्या समोरील उंच टेकडीवर चामुंडा मातेचे मंदीर आहे. मंदीरातील मुर्ती प्राचीन आहे मात्र मंदीराचा जिर्नोधार केल्यामुळे मंदीराचे बांधकाम  नवीन आहे. मंदीराच्या बाजुला जुन्या मंदीराचे अवशेष विखुरलेले पडलेले आहेत. या अवशेषांत एक तुटलेली मुर्ती देखील पहावयास मिळते. मंदीरासमोर एक दिपमाळ आहे. मंदीर बघून आल्या वटेने खाली टेकडी उतरून खाली यावे.
           
पुष्करणी
पुष्करणी

पुष्करणीच्या पाण्यावर हिरव्या जलपर्णीचा तवंग चढलेला आहे. 








उध्वस्त शिव मंदीर





पुष्कर्णीच्या समोरच एक उध्वस्त शिव मंदीर असून  आत उध्वस्त शिव पींड आहे. मंदीरावरील छत पडलेले आहे.



पुष्करणीच्या उजव्या बाजूने आठ-नव कोनाडे आहेत 
त्यातील काही कोनाडयात मुर्त्या आहेत. 




काळाच्या ओघात फुटलेले नंदी शिल्प       
            पुष्कर्णीच्या बाजूलाच रस्तयात एक मोठा तुटलेला एकाच दगडात घडीव नंदी आहे. परंतु याचे तोंडच काळाच्या ओघात तुटलेले आहे. बहुतेक हा नंदी मंदीरासमोर असावा. परंतु तो बाहेर कसा काय आला ?

           










शौचालयाच्या उजव्या बाजूकडील भागातून पाणी जाण्यासाठी असेलेली जागा


शौचालयातील दगडी भांडे









पुष्कर्णच्या डाव्या बाजूला खालील बाजूस एक दगडी चवथरा दिसतो. ही एक वास्तू आहे. ही वास्तु म्हणजे ब-या कमी गडावर दिसणारी ही वास्तु आहे. ही वास्तु म्हणजे गडावरील त्या काळातील शौचालय आहे.  

शौचालयाच्या मागील बाजूच्या भागातून मळ बाहेर जाण्यासाठी असेलेली जागा
















 शैचालयात शैचालयाचे दगडी भांडे आज देखील सुस्थीतीत आहे. या भांडयाची रचना दोन भागात केलेली दिसते. शौचालयातून पाणी जाण्यासाठी स्वतंत्र रचना केलेली आहे तर मळ जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली दिसून येते.


पहिल्या टाक्यात खाली उतरण्यासाठी असणा-या पाय-या
दरवाजावरील गणेश मुर्ती 
            










पुष्कर्णी समोरून पुढे चालत गेल्यास डावया बाजूला तटबंदीकडे चालत गेल्यास आपण सप्त मातृका जवळ येवून पोहचतो. सप्त मातृका म्हणजे सात पाण्याच्या टाक्यांचा समुह. या सातही पाण्याच्या टाक्यांत पाणी आहे. तसेच पहिल्या टाक्यात खाली उतरण्यासाठी पाय-या म्हणजेच कातळात कोरलेला  जिना बनविलेला आहे.जिना जेथे संपतो तेथे दरवाजा आहे. दरवाजावर गणेश मुर्ती कोरलेली आहे. तसेच चौकट आकर्षक सजावट केलेली आहे. या सात टाक्यांमुळे गडावर पाण्याची मुबलक सोय केलेली पाहवयास मिळते.
सात पाण्याच्या टाक्यांचा समुह.
कातळ कोरीव लेणी समुह

लेणीतील दगडी चौकट
      सप्त मातृकांच्या बाजून थोडे खाली उतरल्यास आपण कातळ कोरीव गुहांजवळ येवून पोहचतो. यातील दोन गुहा सुस्थीतीत आहेत. 




कातळ कोरीव लेणी समुह
  कबर पडकी वास्तु  


गुहा बघुन परत वर आल्यावर समोरच एक पडकी वास्तु दिसते. येथे कबर सदृश वास्तु दिसते. एका दगडी शिळेला पांढंरा चुना लावलेला आहे. 














बुजलली पाण्याची टाकी




हे सर्व बघुन आल्यावाटेने परत अपण पुष्कर्णी जवळ येतो. येथुन पुढे सरळ चालत गेल्यास वाटेत पाच अर्धवट बुजलेल्या अवस्थेतील पाण्याची टाके आहेत. 
बुजलली पाण्याची टाकी





बुजलली पाण्याची टाकी














दोन बुजलली पाण्याची टाकी 


असेच गडाच्या मागील बाजूस चालत गेल्यास वाटेत दोन बुजलेली टाकी पाहावयास मिळतात. 






गडाच्या मागील बाजूस कडयाजवळ असणारी दोन माठी पाण्याचे टाके

                गडाच्या मागील बाजुस विस्तीर्ण असा परिसर आहे मात्र या परिसरात कोणतेही बांधकाम आडळून येत नाही. मात्र गडाच्या मागील बाजूस कडयापासून थोडया अंतरावर दोन मोठी  पाण्याची टाकी आहेत. 
टाक्यांत उतरण्यासाठी असणा-या पाय-या




दोन्ही टाक्यात पाणी असुन टाक्यात उतरण्यासाठी पाय-यांची  सोय केलेली आहे. पाण्याची टाकी बघुन पुढे चालत गेल्यास आपण मुख्या सदरेजवळ येतो. येथेच गडाची फेरी पुर्ण होते.


गडाच्या मागील बाजूस कडयाजवळ असणारी दोन माठी पाण्याचे टाके
                    गडाचा विस्तार खुप विस्तीर्ण आहे. त्यामुळे गड फेरीसाठी एक ते दीड तास लागतो.  गडावर फिरतांना सातवाहन संस्कृतीचा प्रभाव असल्याचे जानवते. तसेच इग्रजांच्या राजवटीत इग्रजांनी हा गडाची खुप मोठया प्रमाणात नासधुस केल्याची माहिती सांगीतली जाते. त्याचेच उदाहरण म्हणजे गडावर येतांना  सुरूंग लावून तोडलेल्या गडाच्या पाय-या बघतांना याची प्रचीती येते.
चांमुडा देवी मंदीराकडे जाणारा रस्ता
पडक्या वाडयाचे अवशेष
पडक्या वाडयांचे अवशेष

पाय-यांचा राजमार्ग



No comments:

Post a Comment

चावंड – प्रसन्नगड             23 जून 2019 चांवड करायचा असे ठरले होते. सकाळी 8.00 वाजता माळशेज घाट पार करून गणेश खिंड चढत असतांना ...