अंजनेरी
खर तर खुप
दिवसांनी ट्रेक प्लान करायचा होता. पण काही ठरतच नव्हते. असेच एके दिवशी उदयला फोन करून सांगीतले की, चल
कुठे तरी ट्रेकला जाऊया. एवढेच नाही तर मी त्याला कावनई चा पर्याय ही सुचवला. परंतु
अचानक तो प्लान आमचा पुर्ण होऊ शकला नाही.
मात्र् त्यानंतर दुस-या शनिवारी सकाळी मला उदयचा फोन आला. तो म्हाणाला चल आज
एखादा किल्ला फिरून येऊया. आणि मग काय मी तर खुप दिवसापासून उपाशी असलेल्या एकदम समोर
जेवण मिळावे ते पण आवडीचे लगेच तयार झालो. त्याला म्हटले ये निघुन घरी आमचीच गाडी घेऊन
जाऊया. मी ही तयारीला लागलो. खरं तर तयारी अशी आमची काहीच नसते. कॅमेरा घ्याचा आणि
निघायचे. पाणी सुध्दा किल्याच्या पायथ्याशी असणा-या एखादया दुकानुतन घ्यायचे. आमच्या
सर्वांची हीच तयारी.
मी कपडे घालुन निघेपर्यंत उदय आणि भाई
आमच्या घरी आले पण. मी, माझा भाऊ असे आम्ही चौघे कावनई गड सर करायला 10.30 ला घरातुन
बाहेर पडलो. गाडी जवळ जवळ कसारा घाटात असेल भाई म्हटला अरे कावनई तर जेमतेम 1 ते 2
तासात पुर्ण होईल. त्यापेक्षा आपण अजुन जवळपासचा एखादा गड करूया. मग काया अनेक किल्ले
जवळपासचे समोर आले. आणि मी सुचवलेला अंजनेरी गडावर जायचे ठरविले. तोपर्यंत गाडी घोटी
पार होऊन त्र्यंबकेश्वर रस्त्याला लागली होती. आणि कावनई गडाला पाठीमागे टाकून आम्ही
अंजनेरीच्या दिशेने निघालो होतो.
जवळ जवळ 12 ते 12.30 ला आमही अंजनेरी च्या
पायथ्याशी पोहचलो. खरं तर गाडी. गडाच्या पायथ्यापर्यंत जाते. परंतु रस्ता खराब असल्यामुळे
आम्ही गाडी अर्ध्या रस्तयावरच गाडी पार्क करून पायी जायचे ठरविले. आणि आमचा निर्णय
किती चुकिचा होता हे समजले. कारण थोडा पुढे गेलो तर सर्व रस्ता चांगला होता.
पण काय करणार आता आम्ही ब-यापैंकी पुढे निघुन आलो होतो. आणि आमच्यापैकीं एक ही मागे
गाडी आणण्यासाठी जायला तयार नव्हता. मग काय
आम्ही निघालो गडावर.
पाय-या चढुन वर जातांना डाव्या बाजुला असलेले छोटेशे
दगडी मंदीर
छतावरील सुदंर नक्षी काम
No comments:
Post a Comment