Monday, 29 January 2018


गडवाट आयोजीत वर्षापुर्ती ट्रेक अंकाई-टंकाई




                 गडवाट आयोजीत वर्षापुर्ती ट्रेक अंकाई-टंकाई व राजधेर हा दोन दिवसाचा ट्रेक दिनांक 23 व 24 डिसेंबर 2017 ला आयोजीत होता.
          या ट्रेक ची एक पोस्ट मी माझ्या फेसबुक वॉल ला बघीतली व जाण्याचे प्रयोजन केले. सुरवातीला माझा एक मित्र देखील येणार होता मात्र त्याचा अचानक प्लान कॅनसल झाल्यामुळे मी एकटाच जाण्याचे ठरविले.                    
           गडवाट बरोबर माझा हा पहिलाच ट्रेक असल्याकारणाने मनात थोडी धाकधूक होतीच कारण गडवाटचे सदस्य कसे असणार आपल्याला कशाप्रकारे सामावून घेणार वगेरे-वगेरे, मनात खुप सा-या शंकांची पाल चुकचुकलीच. पन मग ठरविले आपण तर एकटयाने कीतीतरी ट्रेक केलेले आहेत. मग माणचांच्या घोळकयात सुध्दा आपण ऐकटेच आहोत असे समजायचे व आपला आपण एकटेच आनंद घ्यायचा हे माझे नेहमीचेचे नवीन ग्रुप बरोबर ट्रेक ला प्लान केल्यानंतरचे विचार. असो जाण्याचे नक्की केले व तयारीला लागलो.
                 प्रथम साईटवरील उमेश भावले याला फोन केला मी ट्रेकला येणार आहे. याची माहिती दिली. व ट्रेकला कसे जाणार याबाबत खलबत झाली. मात्र 22 डिसेंबरला रात्री निघुन सकाळी 6 वाजता अंकाई गावात पोचावे लागणार होत. आणि इथेच पहिला प्रश्न उधभवला. मात्र उमेश भावले यांनी मला नाशिक रोड वरून निघणारे गडवाटचे दुसरे शिलेदार श्री.किशोर कळमकर यांचा नं. दिला व यांच्याबरोबर सल्ला मसलत करावयास सांगीतले. असो आम्ही लागलीच श्री. किशारे कळमकर यांना  त्रास द्यायचे ठरविले व फोन लावाला. त्यांच्याशी मी माझा अल्पसा परीचय दिला व ट्रेकला कसे जाणार याबाबत  विचारले. तेव्हा त्यांनी मला सांगितले की नाशिक रोडवरून बरेचजण येणार आहेत तर आपण सर्व बाईक वरूनच जाऊया. असे सांगतांच माझा यक्ष प्रश्न सुटला व मी ट्रेकला जाणार हे नक्की झाले.
              मात्र ट्रेक च्या आदल्या दिवशी किशोर कळमकर यांनी  फोन करून असे सांगितले की आपण गाडी केलेली आहे तरी आपण सकाळी शार्प 4.30 ला बिटको पाँईंटला येऊन थांबा., उशीर करू नका कारण आपल्याला 6.00 वाजता अंकाई गावात पोहचायचे आहे. मी हो म्हटले व फोन ठेवून दिला.
           दि.23/12/2017 सकाळी 4.15 ला तयारी झाली . बॅग घेऊन बिटको पॉईंटला जाण्यास निघालो. घरातून बाहेर निघताच डिंसेबरच्या थंडीची जाणीव झाली. रस्त्याने मी ऐकटाच महानगरपालीकेच्या दिव्यांच्या प्रकाशात चालत निघालो. रस्त्याच्या कडेला थंडीत कुडकुडणारी कुत्री झोपलेली होती. माझ्या पायांच्या आवाजाने त्यांना देखील जाणीव झाली असावी या निरव शांततेतचा भंग करण्यास कोणता प्राणी आला असावा. त्यांनी माना वर करून त्यांच्या साथीदारांना माझ्या येण्याची वर्दी दिली देखील मी मात्र माझ्याच जिवाच्या भीतीने घाबरून हातात एक काडी घेवून त्यांना घाबरवण्याचे नाटक केले व माझ्या रस्त्याने पुढे निघालो. शार्प 4.30 ला बिटको पाँईंटला टच झालो. 
                रत्याला एक-दोन रिक्षा सकाळी सकाळी कोण गिराईक भेटते का याची वाट पाहत उभे होते. त्यातील एकाने शेवटी मला विचारलेच कोठे जायचे म्हणून. असेा त्या सदगृहस्ताला नाही सांगून मी बीटको पॉईंटच्या मधोमध असणा-या सर्कलवर येऊन थांबलो. नाईट डयुटीवर असणारा पोलीस माझ्याकडे एका वेगळया कटाक्षाने नजर टाकून परत आपल्या केबीनमध्ये जाऊन बसला. मी आपला 15 मिनटे वाट पाहून किशोर ला फोन केला. तर किशोर ने सांगीतले गाडी येण्यास उशीर होणार आहे. तुम्ही तेथेच थांबा. असेा एव्हाणा रस्त्याने जाणारे योणा-या गाडीतले लोक माझ्याकडे एका वेगळयाच नजनरेने बघून जात होते. कारण माझ्या पाठीवर भली मोठी ट्रेकी्ंग सॅक आणि भल्या पाहाटे एकटाच रस्त्यावर उभा 
            एव्हाना पाच वाजले मॉर्नींग वॉक ला जाण्या-यांची ये-जा चालू झालेली. तसेच कामावर जाणारे सुध्दा रस्त्याने दिसु लागले.
                 जवजवळ 6 वाजता किशोर भाऊनी सांगीतलेली गाडी बीटको सर्कलला आली. त्यांना मला ओळखण्यात काही ही अडचण आली नाही. कारण भटक्यांच्या  यादीतील सर्व लक्षणे माझ्यात भरलेली होती आणि तेथे मी एकटाच उभा असल्याने गाडीतील एकाने खाली उतरून मला विचारले डगळे तुम्हीच का? (त्याचे नाव ज्ञानेश सहाणे नंतर कळलेले ) हो सांगून गाडीत चढलो गाढीत आधीच सातआठ जण बसलेले होते. मी चढताच त्यांनी मला थेाडी जागा करून दिली. मी आपला कोणी ओळखीचा नाही. म्हणुन जुजबी बोलून आसनस्थ झालो.( गाडी. म्हणजे माझ्यासाठी एक शॉक च होता. माझ्या कल्पनेपलीकडची एक भाजीपाला भरण्याची पीकअप त्यात खाली गवत टाकून त्यावर ताडपत्री टाकलेली. आणि आम्ही सगळे मांडी घालून बसलेलेा. एक अविस्मरणीय प्रवास अंकाई - टंकाई ट्रेकचा.)
        बिटको सर्कलला माला सर्वात प्रथम विचारणारी व्यक्ती म्हणजे ज्ञानेश्वर सहाणे नंतर ओळख झाली. अप्रतीम व्यक्तीमत्व. गाडीत माझ्या आधी बसलेल्यामध्ये नीलेश , समाधान, योगेश मोंढे (मेजर),गोडधने, सहाणे असे बरेच जण होते. बिटेको पॉईंटला अजुन दोन मुलींना पिकअप करून आमचा पुढील प्रवास सुरू झाला. जवळ जवळ अर्धा तासाने आम्ही किशोर ला पिकअप केले. आणि सकाळी 7.30 ला अंकाई गावात पोहचलो. मुंबई पुणे येथील गडवाटकरी आधीच पापेहचले होते. एव्हाणा सकाळच्या नाष्टयांची तयारी झालेली होती. पोहे आणि चहा.एव्हाना मेजर योगेश मोंढे सर यांच्याबरोबर चांगलीच मैत्री झल्यामुळे आम्ही बरोबरच नाष्टा आटोपला. 

              सर्वांचा नाष्टा झाल्यानंतर BSF दादा यांनी ट्रेकचा धावता आढावा घेतला व कसे जायचे कोण पुढे असणार आणि शेवटी कोण असणार याबाबत माहिती दिली व कुठे थांबायचे व कुठे नाही याबाबत देखील माहिती दिली. व काऊंट घेतल्यावर समजले एकुण 110 गडवाटकरी आजच्या ट्रेकसाठी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून आलेले होते. असो सर्व सुचना देऊन झाल्यानंतर  आमची अंकाई किल्यावर चढाईस सुरवात झाली. 

            अंकाई गावातील शाळेसमोरच रस्त्याच्या बाजुला उघडयावर एक गणेशमुर्ती व काही वीरगळी ठेवलेल्या आहेत. 




तसेच गणेशमुर्तीच्या समोरच एक पुरातनकालीन पडकी वास्तु असून त्याच्या गेटवरच एका दगडात कोरलेल्या तीन मुर्ती आहेत.
               

एव्हाण ब-याच जणाबरोब ओळख झाली होती . जणु काही आम्ही सर्वच जण एकमेकांना खुप दिवसांपासून ओळखत होतो अशा गप्पा चालू झाल्या. 
            अंकाई किल्याच्या पायथ्यालाच जैन लेणी आहेत मात्र आम्हाला दिलेल्या सुचने  नुसार आम्ही प्रथम किल्ला चढाई करणार होतो व नंतर दुपारनंतर लेणी बघणार होतो. त्यामुळे आम्ही लेण्याकडे न वळता सरळ पुढे चालत राहीलो. एव्हाण 10 मिनटाच्या चढाईनंतर किल्याचा पहिला भक्कम असा दरवाजात आम्ही पोहचलो.

           
 किल्याची  तटबंदी अगदी भक्कम आहे. तसेच प्रथम दरवाजा हा आजही चांगल्या स्थितीत आहे. भक्कम असे दगडी बांधकाम. मनाला अगदी भुरळ घालणारे. जो तो आप-आपल्या कॅमे-यात छायाचित्रणाचा आस्वाद घेत होते. प्रथम दरवाजा हा दोन्ही बाजूनी दगडी बुरूजांनी बांधलेला आहे तसेच दोन्ही ही बुरूज आज सुस्थीतीत आहेत. डाव्या बाजूच्या बुरूजावर निवडूंगांचे भलेमोठे झुडूप वाढलेले आहे. मात्र तरीही त्या बुरूजाच्या सौंदर्यात तसूभरही कमतरता जाणवत नाही. संपूर्ण गडावरील तटबंधी आजही चांगल्या स्थितीत आहे. 
             
प्रथम दरवाजातून शिवाजी महारांना स्मरून आपण गडावर प्रवेश करतो. मुख्या दरवाजातून आत शिरताच परत उजव्या बाजूला अजुन एक दरवाजा लागतो. दरवाजा खुप चांगल्या स्थितीत असून दरवाजाच्या कमानीवरील सज्जा वर लाकडी फळी ठेवून त्यावर दगडी चीरे रचून बांधकाम केलेले आहे.
दरवाजा हा लाकडी फळयानी बनवलेला होता. आज मात्र एका बाजूची एकच फळी तग धरून उभी आहे.  





आतमध्ये पाहरेक-यांसाठी देवडया आहेत. 






थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजुला टंकाई किल्ला तर डाव्या बाजूला अंकाई किल्ला आहे.
       

तसेच समोरच वायव्य दरवाजा आपले लक्ष वेधून घेतो. या वायव्या दरवाजास मनमाड दरवाजा असे देखील म्हणतात. 










मनमाड दरवाज्याची भव्यता अनुभवायची असल्यास दरवाज्यातून खाली उतरून बघावे.दगडी बांधकाम बुरूज याची भव्यता लक्षात येते. 







 


अंकाई किल्याच्या दिशेने वळल्यावर वाटेतच एक छोटी वास्तू पाहवयास मिळते. पुर्वीच्या काळी या वास्तुचा वापर कचेरी म्हणून होत असावा. किल्यावर जाण्याचा परवाना येथे दिला जात असावा. 


 या वास्तुच्या मागेच किल्याचा चौथ्या प्रवेशव्दारापाशी येवून पोहचतो.  या प्रवेशव्दाराच्या दोन्ही बाजूला भव्य असे दोन बुरूज बांधून दरवाजा संरक्षीत केलेला आहे. मात्र आता त्याच्या भिंतीवर निवडूंगांचे वर्चस्व पहावयास मिळते.

या दरवाजातून वर गेल्यास डाव्या बाजूला एक लेणी समुह पाहवयास मिळतो. या लेण्याच्या समोरच एक पाण्याचे टाके आहे. ते आज बुजण्याच्या अवस्थेत आलेले आहे. त्याच्या आजुबाजूला झुडपे वाढलेली आहेत.

                         या लेण्यांची खूप मोठया प्रमाणवर झीज झालेली आहे.                                   


 या लेण्यांची खूप मोठया प्रमाणवर झीज झालेली आहे.त्यामुळे गाभा-याच्या बाहेरील भिंतीवरील मुर्त्या अजीबात ओळखता येत नाही. लेण्याच्या आत एक गर्भगृह कोरलेले आहे त्याच्या बाहेरील भिंतीवर जय आणि विजय यांच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत. या गर्भगृहात वटवागळांचे साम्राज्य असल्यामुळे आत खूप दुर्गधी येते.
           
 लेणी बघून परत पाय-यांनी वर चढून गेल्यास आपण किल्याच्या चौथ्या दरवाजा जवळ येतो. 




















या दरवाजात  खाली बसून आत बघितल्यास वर पाचवे प्रवेशव्दार दिसते. हा नजारा खरोखर बघण्यासारखा आहे. चौथ्या व पाचव्या प्रवेशव्दारामधील पाय-यांचा भाग आच्छादीत आहे. 


येथील पाय-या मात्र एका बाजूला डोंगराची बाजू तर दुसरा भाग हा कातळ कडयाचा आहे.  पाचव्या दरवाजातून वर गेल्यास तेथे एक शेंदूर लावलेली छोटी मुर्ती  मुंजा महाराज यांची आहे.













येथुन जीना काटकोनात वळतो. हा जिना चढून वर गेल्याच आपण किल्याच्या सहाव्या दरवाजात येवून पोहचतो. 





या दरवाजातून थेाडे वर  गेल्यास डाव्या बाजूस दोन पाण्याची टाकी आहेत मात्र ती जवळ जाईपर्यंत  दिसत नाही. कारण ती झडाझुडपाने आच्छादीत झालेली आहेत. 

तसेच येथुन अंकाई किल्याचे विलोभनीय दृष्य पहावयास मिळते. येथुनच आपण मुख्या किल्यावर प्रवेश करतो. सरळ वर चंढुन गेल्यास आपण  मुख्या किल्याच्या गुहेपाशी येवून पोहचतो. मात्र मी सरळ वर न जाता टाक्यांपासून उजव्या बाजूने डोंगराच्या कडे-कडेने (मनमाडच्या बाजूने)चालत निघालो 
रस्त्याला लागूनच उजव्या बाजूने तीनचार टाक्यांचा समुह आहे. 



टाके पाहुन तसेच पुढे गेल्यास आपल्याला निवडूगांच्या झाडांवर खूप मोठया प्रमाणात कपडे फेकलेले दिसतात. येथून थेडे वर गेल्यास आपण एका कातळ कोरीव तलावापाशी येवून पोहचतो. 
 याच तलावाला काशी तलाव असे म्हणतात. या तलावाच्या मध्य भागात एक समाधी आहे ही अगस्तीऋृश्रींची समाधी आहे असे म्हणतात. 
तसेच येथे अजून चार समाध्या आहेत. याच तलावात स्थानीक लोक अंघोळ करून ओले कपडे तेथेच सोडून देतात. त्यामुळेच तेथील निवडूंगाच्या झांडांना खूप मोठया प्रमाणावर कपडे अडकलेले आपणास पाहवयास मिळतात.


येथुन थोडे पुढे गेल्यास अजुन एक तलाव लागतो. या तलावाच्या एका कडेला खडकात शंकराची पींड व पींडीच्या बाजुला नंदी कोरलेला आहे. तसेच या पींडीच्या वरच्या बाजूस एक शेंदूर लावलेला दगड आहे.
       तलावाच्या थोडे पुढे एक मोठी वास्तु आपणास दिसते. ही म्हणजे वाडा होय. या वाडया बाहेर एक तलाव आहे. या वास्तुचे छत अस्तीत्वात नाहीत फक्त कमाणी तेवढया शिल्लक आहेत. वाडयात एकमेव खोली शिल्लक आहे. 



















तसेच वाडयाच्या आत एक मोठा तलाव आहे. त्या तलावाचे एकुण चार भाग पडतात. आज ते कोरडया 

अवस्थेत अाहेत. 



 या तलावाबाबत गावकरी एक कथा सांगतात की या तलावात मधोमध जर नारळ टाकला तर तो नारळ मनमाडच्या नदीमध्ये मिळतो. तसेच या तलावाच्या खाली एक मोठे भुयार असावे असे गावक-यांना वाटते. या तलावात आतील बाजुने एक छोटा झरोका बांधलेला आहे. त्याचे प्रयोजन काही केल्या समजत नाही. मात्र हा झरोका म्हणजे त्या काळातील तळयाखाली असणा-या भुयारात जाण्याचा गुप्त मार्ग असावा. मात्र आज तरी त्या खिडकीसारख्या झरोक्यातून आत जाणे शक्य नाही. एवढा तो लहान आहे. (याबाबत संध्याकाळच्या चर्चासत्रात BSF दादांनी खुप मोठयाप्रमाणात विस्त्रृत स्वरूपाची माहिती सांगितलेली आहे. मात्र ती आता तरी माझ्या तेवढी लक्षात न राहील्यामुळे त्यांच्याकडून जर ती माहिती मला भेटली तर या ट्रेकचा दुसरा भाग राजधेर च्या ब्लॉग मध्ये तीचा समावेश नक्की करेल)









    




वाडयाच्या एका टोकाला पांढरा रंग देऊन पिराची स्थापना केलेली आहे. त्यातही वरच्या बाजूला मोठे बाबा असे म्हणतात. तेथे स्त्रीयांना प्रवेश नाही. असी सुचना लिहीलेली आहे.     




         


     

वाडा बघुन परत मुख्य किल्याचे दिशेने चालत आल्यास आपण अगस्ती ऋृषींच्या आश्रमापाशी येऊन पोहचतो. अगस्ती ऋृषींची गुहा तसेच आजुबाजूचा परिसर लादया बसवलेला आहे. या आश्रमात काही साधुलोक राहतात. 

अगस्ती ऋृषींच्या गुहेबाहेर शेंदुर लावलेली हनुमानाची सुंदर मुर्ती आहे. 


या गुहेच्या डाव्या बाजूला एक पिण्याचे पाण्याचे टाके आहे. मात्र येथे जाण्यासाटी आपणास चार फुट वर चडून जावे लागते तेव्हाच आपणास हे टाके पहावयास मिळते. टाक्यातील पाणी स्वच्छ तसेच थंडगार आहे. 

 येथुन थेडे पुढे गेल्यास अजुन एक गुहा आहे. या गुहेस सिता गुंफा असे म्हणतात. या गुंफेच्या बाहेर व आत असे दोन पाण्याची टाके आहेत. या गुहेत स्थानीक लोक गुरे बांधतात. त्यामुळे ही गुहा राहण्यायोग्य नाही. 



या गुहेच्या डाव्या बाजुने टेकडीच्या मागच्या बाजुने थोडे वर चढून गेल्यास उजव्या बाजूला एक निसर्ग निर्मीत गुहा आहे. मात्र या गुहेत आत जाता येत नाही. परंतू खाली वाकून आत बघितल्यास आत ब-यापैकी जागा दिसते.



तसेच डाव्या बाजून वर चढत गेल्यास टेकडीच्या मागच्या बाजूने एक छोटा कातळ टप्पा पार केल्यास वर डाव्या बाजूला एक पाण्याचे टाके आहे. येथुन थोडे वर गेल्यास कातळात खोदलेला एक स्वच्छपाण्याचे टाके आहे. या टाक्याच्या आत चार खांब आहेत.











येथुन 

मागच्या 

बाजूला
खालीएक
कोरडे 

टाके 

दिसते.

येथुनच आपण किल्याच्या पठारावर पोहचतो. पठारावर एक ध्वजस्तंभ सोडुन बाकी कुठलेही अवशेश नाहीत. या सर्वोच्च स्थानावरून पुर्वेला टंकाई किल्ला दक्षिणेला गोरखगड, हडबीची शेंडी, व कात्रा किल्ले दिसतात. या सर्वोच्च स्थानावरून सिता गुहेकडे उतरता येते. येथेच आपली गडफेरी पुर्ण होते.



               अंकाई किल्यावरून दिसणारा टंकाई किल्ला







    एव्हाना 12.00 वाजले होते. आता ओढ टंकाई किल्याची होती. खाली  खींडीत उतरून टंकाई किल्याच्या चढाईला सुरवात केली. 


गडाच्या       
उजव्या 
बाजूवरील 
तटबंदी


 प्रथम उजव्या बाजूने किल्याच्या तटबंदीच्या बाजून वर गेल्यास अंकाई किल्यावरून दिसणारे पाण्याचे टाके पहावयास मिळतात.










 पाण्याची टाके पाहून परत खाली उतरून डाव्या बाजूने मुख्या किल्यावर चढाईस सुरवात करावी. येथून वर जाण्यासाठी  कातळात पाय-या खोदलेल्या आहेत. येथुन थोडे वर चढून गेल्यास दगडी पाय-यांचा जीना आहे.



येथुन डाव्या बाजूस दोन पाण्याचे टाके आहेत. टाके पाहुन परत 


पाय-यांपर्यंत यावे व कातळात कोरलेल्या पाय-यांच्या ओबडधोबड मार्गाने  15 मिनटांत आपण मुख्या प्रवेशव्दारापर्यंत पोहचतो. टंकाई किल्यावर एकमात्र पश्चिमाभिमुख प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दाराला बसविण्यात आलेली लाकडी चौकट आजही सुस्थीतीत आहे.














प्रवेशव्दारातुन आत गेल्यास आत देवडया बांधलेल्या आहेत. देवडयांच्या बाजूलाच एक 
खोली बांधलेली आहे. त्यात पीर आहे. 


याच वाटेने पुढे गेल्यास डाव्या बाजूला खडकामध्ये छोटे-छोटे खडे गोलाकार पाडलेली जागा पहावयास मिळते. याचा उपयोग बहुतेक तोफ ठेवण्यासाठी होत असावा. व गोलाकार खडयांचा वापर तोफ हव्या त्या दिशेला फिरवण्यासाठी होत असावा. 
येथुन खलच्या बाजुला एक टाके आहे. मात्र पाणी पिण्यायोग्य नाही. 










येथुन पुढे आपणास खुप मोठा असा पपाट पठार आहे. आणि या पठाराच्या मध्यावर्ती भागात एक हेमाडपंथी मंदीर आहे. मंदिर दोन भागात आहे. गाभारा व सभामंडप. मंदीराचे छत अस्तीत्वात नाही. मात्र मंदीरावरील नक्षीकामामुळे त्याच्या सौदंर्याची कल्पना येते. गाभा-यात शिवपींड आहे तर सभामंडपात नंदी आहे. मंदीरावरील संपूर्ण नक्षीकामाची अतोनात झीज झालेली आहे. 

मंदीराच्या समोरच कातळात खेदलेला एक मोठा तलाव आहे. तसेच तलावाच्या बाजुला एक समाधी आहे. समाधी कोणाची आहे याची काही माहिती उपलब्ध नाही. 










यांच्या पुढे पुर्वेकडे चालत गेल्यास डोंगर निमुळता होत गेलेला आहे.


येथेच उतारावर दोन कोरडी टाकी आहेत. अजून थोडे खाली  उतरल्यास खाली टोकावर एक छत नसलेली इमारत आहे. 



या इमारतीस मध्यभागी एक खीडकी वजा झरोका आहे. या इमारतीचा वापर टेहाळणीसाठी होत असावा. 






या वास्तुच्या डाव्या बाजूने डोंगराच्या टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे. टोकाकडील उजव्या बाजूची तटबंधी ढासळलेली आहे. या वास्तुंचे अवशेष बघून परत आल्या वाटेने मागे फिरून मुख्या प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गड फेरी पुर्ण होते.
                    टंकाई किल्ला पाहुन परत खाली उतरून लेण्यापर्यंत पोहचलो. आमच्या आजच्या प्लाननुसार आमच्याजवळ अजुन एक तास भर वेळ शिल्लक असल्यामुळे आम्ही लेणी बघुनच खाली उतरण्याचे ठरविले. 

लेणी दोन स्तरावर बांधलेली आहेत. किल्यावरून आल्यानंतर डाव्या बाजूला पाच लेणी समुह पाहावयास मिळतो.  हे लेणी दहाव्या ते बाराव्या शतकात खोदलेली असतात. पहिली दोन लेणी ही दुमजली आहेत. त्यात पहिल्या दोन लेणी ही हिंदू ब्राहमणी लेणी आहेत. या लेण्यांचे एकुण तीन भाग पडतात. त्यात ओसरी सभामंडप व गाभारा असे आहे.सभामंडपातून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जीना आहे. या लेण्यांत ऐक देवीची मुर्ती आहे. 


तर इतर तीन लेणी जैन लेणी आहेत. यामध्ये जैन तीर्थकारांच्या मुर्त्या आहेत. या लेण्या बघून खाली उतरल्यास अजुन दोन लेणी समुह आहे. 

लेण्यांच्या समोर पाण्याचा मोठा तलाव आहे. या दोन्ही लेण्यामध्ये कोणत्याच मुर्त्या नाहीत. येथे आपला अंकाई - टंकाई किल्ला बघून पुर्ण होतो.
                 बरोबर दूपारी तीन वाजता आम्ही अंकाई गावातील शाळेजवळ आलो. गडवाट क-यांनी जेवणाची उत्तम अशी सोय केललेली होती. किल्यावरील भ्रमंतीमुळे सर्वांनाच चांगलीच भुक लागलेली होती. त्यातच उत्तम जेवन असल्यामुळे सर्वांनींच अक्षरशहा जेवणावर ताव मारला. सर्वांचे जेवन होईपर्यंत चार वाजले होते. आणि आता आजच्या  मुक्कामाच्या दिशेने प्रवासास सुरवात झाली. व अशाप्रकारे आम्ही अंकाई - टंकाई किल्यास शेवटचा निरोप देवून आमच्या मुक्कामाच्या दिशेने निघालो.

                                            -: समाप्त :-

 






























चावंड – प्रसन्नगड             23 जून 2019 चांवड करायचा असे ठरले होते. सकाळी 8.00 वाजता माळशेज घाट पार करून गणेश खिंड चढत असतांना ...