बस गड नावातच वेगळेपण . नेटवर सर्च केल्यानंतर समजले
की,बसगड ला च भास्करगड असे म्हणतात.
असेच ऐका शनिवारी आम्ही बसगड वर जाण्यासाठी निघालो
मात्र भाई येणार नाही असे समजले परंतु सकाळी निघताना अंकुश तयार झाला. तसेच उदय पण
त्याच्या बरोबर एकाला घेऊन आला असे आम्ही पाच जण बसगडाच्या दिशेने सकाळी 10 वाजता निघालो. बसगडला जाण्यासठी पायथ्याचे
ठिकाण निरगुडपाडा हे असल्यामुळे तसेच उदयने हरिहर गड चा ट्रेक केलेला असल्यामुळे निरगुडपाडयाचा
रस्ता माहित होता मात्र यावेळी आम्ही घोटी - निरगुडपाडा न जाता आम्ही कसारा - जव्हार
फाटा मार्गे जाण्याचे ठरविले. आणि हा मार्ग आमच्यासाठी खुप फायदयाचा ठरला. आम्ही जेमतेम
दोन अडीच तासातच बसगडच्या पायथ्याचे गाव निरगुडपाडा नव्हे तर त्याच्या अलिकडे असणारा
पाडा येथे पोहचलो रस्तयावर एका आजीबाईंना बसगडावर जाण्याची वाट विचारली असता त्यांनी
आम्हाला असेच पुढे जावा निरगुडपाडयातुन तुम्हाला वर जाण्याचा रस्ता भेटेल तसेच असेही
सांगींतले की गाडी सुध्दा ब-यापैकी वरपर्यंत जाते. अशी माहिती घेऊन आम्ही निघणार तोच
तेथे एक गावातील व्यक्ती ने आम्हाला आवाज दिला. (साधारण शेताच्या कामावर जाण्यासाठी
निघालेला तीशीतील एक तरून ) त्याने सांगीतले निरगुडपाडयाला न जाता तुम्ही येथेच वरच्या
साईटने गाडी आत टाका समोर दिसाणा-या ओढयाच्या जवळ गाडी लावून समोरच्या डोंगराच्या धारेने
वर चढायला सुरवात करा. वर बसगडाच्या पायथ्याजवळ गेल्यावर डोंगराच्या मागच्या बाजूने
गेल्यानंतर डोंगराच्या मध्यावर तुम्हाला बसगडावर जाण्यासाठी असणा-या जिन्याच्या पाय-या
लागतील . (त्यालाच चक्राकार जिना असे म्हणातात. तसेच बसगडावरील स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट
नमुणा जो आज काळाच्या ओघात कात टाकत आहे.)
खरं तर आपल्याला नेहमी सांगीतलेले असते
की, मोठयांचे ऐकत चला. त्यांचा अनुभव हा नेहमी फायदयाचाच असतो. परंतु आपण नेमके तेथेच
माती खातो. कारण याच गोष्टीचा आम्हाला पुढे पुरेपुर अनुभव येणार होता.
आम्ही आजीबाईनी सांगीतलेल्या रत्याने न
जाता त्या तरूनाणे सांगीतलेला रस्ता निवडला व गाडी कच्या रस्तयाने आत टाकली. पुढच्या
काही मिनंटातच आम्ही ओढया पर्यंत पोहचलो गाडी साईटला पार्क केली. आम्ही पुढे जानार
तोच मागून त्याच व्यक्तीचा आवाज आला खालच्या बाजूने रस्ता आहे. आमची बसगडच्या दिशेने
चढाईला सुरवात झाली. (परंतू आम्हाला पुढच्या रस्तयाची काही कल्पना नव्हती त्यामुळे
आम्ही मस्त रमतगमत चाललो होतो. परंतु आम्हाला पुढे जाऊन आजींची चांगलीच आठवण येणार
हे मात्र त्या आजींनाच माहीत असणार. कारण अनुभवाचे बोल न एकता आम्ही तरूणांच्या विचारांवर
माहितीवर विश्वास ठेवला होता.)
ओढयाच्या डाव्या बाजून सरळ वर चढत गेल्यास
आपण अर्धातासानंतर बसगडाच्या दक्षिणेचया बाजुने दिसणा-या सोंडेच्या समोर येऊन पोहचतो.
येथुन सरळ सढाई करावी लागते.वाट तसी निसरडी आहे मात्र सुरक्षीत पणे चढाई केल्यास काही
अवघड नाही. तसेच थेडे वर चढून गेल्यास जव्हार खेडाळा चा परीसर दिसु लागतो. तसेच पासाळा असल्यामुळे संपूर्ण
डोंगराने जनु हिरवा शालु पांघरला होता. आणि त्यात आमच्या सारख्यांना शेल्फी घेण्याचा
मोह झाला नाही तर नवलच. तसेच आमच्या प्रत्येकातील फोटोग्राफरही जागा झाला होता त्यामुळे
समोर बसगडाची सोंड दिसत असुन देखील मनसोक्त फोटो काढण्यात व्यस्त झालो होतो.
एव्हाना पावसाची रिमझीम चालू झाली होती तसेच धुक्याने बसगडाला केव्हाच आपल्यात सामवून घेतले होते. धुक्यात गडप झालेला बसगड खरच एक अविस्मरणीय असा तो क्षण होता. आम्ही ते दृश्य आमच्या कॅमे-यात टिपतच चढाई सुरवात केली.
एक तासाच्या सरळ चढाई नंतर आम्ही बसगडाच्या पायथ्याला पोहचलो. येथुन वर संपूर्ण कातळ कडा (बसगडाचा माथ हा बेसॉल्ट खडकाने बनलेला आहे.) आम्हाला मिळालेल्या माहिती नुसार आम्हाला डोंगराच्या डाव्या बाजुने चालत जायचे होते. एव्हाना सरळ चढाई केल्यामुळे आम्ही सर्वच जन थकून गेलो होतो. परंतु आता डोंगराच्या कडेने सरळ आडेवे चालत जायचे असल्यामुळे आम्ही सुखावलो पण होतो.
मात्र आता आम्हाला चांगलीच भुख लागली होती.
आणि आमच्या नेहमीच्या सवई प्रमाणे कोणताही ल्पानींग नसल्यामुळे आमच्याजवळ खान्यासाठी
फक्त एक डजन केळी जी रस्तयावरील दुकानातुन घेतलेली .एक लीटर पाण्याची बाटली. दोन पारले
जी एवढेच. आणि खाणारे पाच तेही भुकेलेले.
आम्ही सर्वांनुमते केळी खाण्याचे ठरविले
कारण आमच्या माहिती नुसार बसगउावर जाण्यासाठी दोन तास लागतात. आणि त्यात आम्ही बसगडाच्या
पायथ्याजवळ तर पोहचलो होतो. म्हणजे अजुन पंधरा -वीस मीनटात आम्ही गडाच्या माथ्यावर
असु.त्यामुळे आम्ही केळी खाण्याचा निर्णय घेऊन पारले जी गडावर खान्यासाठी ठेवले. सर्वानी
दोन दोन केळी खाली व उरलेली दोन केळी पाच जनांत अर्धी अर्धी . पणी पिल्यानंतर आम्ही
कातळ कडयाच्या बाजुने चालण्यास सुरवात केली. जेमतेम पाच च मिनटांत आम्ही एका गुहीपाशी
ऐऊन पोहचला.
गुहा गुहा तशी प्रशस्त आहे. 15-20 जनांना राहता येईल अशी तसेच गुहेच्या एका कोप-यात पाणी असुन त्या पाण्यात शंकराची पिंड आहे व त्यावर अविरत डोंगरातुन झिरपणा-या पाण्याचा अभिषेक चालू होता. खुप छान वाटले तसेच रात्री मुक्काम करण्यासाठी ही जागा असावी कारण तेथे मांडण्यात आलेल्या दगडी चुलींवरून आम्ही अंदाज काढला. तसेच पाण्याची ही सोय होतीच. (मात्र उन्हाळयात येथे पाणी असते की नाही याची कल्पना नाही.)
गुहा गुहा तशी प्रशस्त आहे. 15-20 जनांना राहता येईल अशी तसेच गुहेच्या एका कोप-यात पाणी असुन त्या पाण्यात शंकराची पिंड आहे व त्यावर अविरत डोंगरातुन झिरपणा-या पाण्याचा अभिषेक चालू होता. खुप छान वाटले तसेच रात्री मुक्काम करण्यासाठी ही जागा असावी कारण तेथे मांडण्यात आलेल्या दगडी चुलींवरून आम्ही अंदाज काढला. तसेच पाण्याची ही सोय होतीच. (मात्र उन्हाळयात येथे पाणी असते की नाही याची कल्पना नाही.)
येथे थेाडी फोटोग्राफी करून आम्ही पुढच्या
प्रवासाला सुरवात केली. जवळ जवळ आम्ही डोंगराच्या दुस-या टोकापर्यंत पोहचलो होतो. कारण
समोरच डोंगराचा शेवटचे टोक दिसत होते सर्वांना वाटले अता येथुनच वर जाणारा सर्पीलाकार
जिणा असणार या आशेने आम्ही तेथे पोहचलो .,
मात्र आमची घोर निराशा झाली डोंगराच्या त्या सोंडेवर
एक खडकात खोंदलेले पाण्याचे टाके पावसामुळे काठोकाठ भरलेले होते. खोलीचा अंदाज येत
नव्हता. मात्र वर जाण्यासाठी सर्पिलाकार जिना तर सोडाच साधी वाट सुध्दा नव्हती. होता
तो फक्त कातळ कडा .एव्हाणा अर्धा-पाऊन तास झाला होता. आणि आम्ही समजून चुकलो होतो की
आपण रस्ता चुकलेलो आहोत.
आणि हाच तो अनुभव की, नेहमी जाणत्या - मोठयांचे
एकत जावे., मोठयोचे अनुभव सल्ले हे योग्यच
असतात. मोठयांचे ऐकल्याने फसगत होत नाही. असे आमचे प्रत्येकाच्या मनातील शब्द एकदाचे
प्रत्येकाच्या तोंडावर आले. कारण आम्हाला चाढाई पुर्वी आजीबाईनी योग्य रस्ता सांगीतला
होता परंतु आम्ही तरून नेतृत्वाचे ऐकले व तो मार्ग निवडला ज्यामुळे आम्ही डोंगराच्या
दुस-या टोकावर येऊन पोहचलो होतो. तसेच ऐव्हाना आमच्या माहितीनुसार आम्ही तर गडावर असायला
हवे होते. परंतु आम्ही अजुन गडाच्या पायथ्याजवळच गडाला वळसा घालतोय तो माहित नसलेल्या
रस्तयावर.
हे
कातळात खोदलेले छोटया आकाराच्या गुहा. यांचा त्या काळात नक्कीच काही तरी वापर होत असणार.
मात्र आता त्यांचा वापर हा फक्त जगंली प्राणी आपल्या निवा-यासाठी करत असावेत.
मात्र हार माणनारे ते आम्ही गडवेडे कुठले . आम्ही
सर्वानुमते तसेच गडाच्या कडेकडेने पुढे जाण्याचे ठरविले. रस्ता असा नाहीच परंतु आम्ही
पुढे चालत राहिलो. आम्हाला काही कल्पना नव्हती की आम्हाला या रस्त्याने संपूर्ण गडाला
फेरी मारल्यानंतरच गडावर जाण्याचा रस्ता भेटणार होता. तसेच हा सुध्दा गडावर जाण्याचा
एक मार्ग आहे मात्र या मार्गाचा जास्त वापर केला जात नाही. हे आम्हाला जाणवत होते.
तसेच काही अंतर चालून गेल्यानंतर एक कपार दिसली आणि त्या कपारीतील माती ही एखादा प्राणी
बसल्यानंतर जशी होते तशा प्रकारची दिसली. आणि प्रत्येकाच्या मनात आलेला विचार म्हणजे
येथे नक्कीच एखादा प्राणी बसलेला असणार आणि अता तो खान्याच्या शोधात बाहेर गेला असावा
हा विचार एकाच्या तोंडावर आला देखील. आता मात्र आमची चांगलीच फाटली होती. कारण अजुनही
गडावर जाण्याचा रस्ता आम्हाला भेटला नव्हता. तेथुन लवकरात लवकर आम्ही पुढे निघुन गेलो
खरे मात्र , युवराज बोलला की मी प्रत्येक वेळी गडावर जातांना कोयता घेऊन येतो आज तो
देखील आणला नाही. तेवडयात उदय म्हटला की, आपल्याला अंधार होण्याच्या आत फिरावे लागणार
नाही तर काही खरे नाही. कारण संपुर्ण जंगलाचा रस्ता होता. आम्हालाही तेच वाटत होते.
मध्येच विचार देखील आला की, परत मागे फिरावे. कारण
आतापर्यंत जवळ जवळ एक तास होऊन गेला होता आम्ही डोंगराच्या कडेकडेने चालून आणि रस्ता
काही भेटत नव्हता. त्या जंगलातील रस्तयाने आम्ही पाच जण फक्त चाललो होतो. कोणाचा दुस-यांचा
आवाज देखील येत नव्हता. त्यात आता पावसाने देखिल रिपरीप चालू केली होती. सर्वच जण आतुन
खचले होते. मात्र वर कोणी ही दाखवत नव्हते. तसेच रस्ता सांगणा-याला आतापर्यंत शिव्यांची
बरसात करून झाली होती प्रत्येकाची. सांगणा-याने सांगीतलेला रस्ता बरोबर होता परंतु
तो संपुर्ण गडाला वळसा घालून होता. जास्ती वापरात नसलेला होता. हे त्याने आम्हाला सांगीतले
नाही. तसेच आमचे ज्ञान म्हणजे दोन तासात गडावर पोहचतो एवढेच होते.,
सर्वानुमते
असेच थेाडे पुढे जाऊन बघुया रस्ता भेटला तर ठीक नाही तर आल्या रस्तयाने परत माघारी
फिरूया. असे ठरले. थेाडे पुढे गेल्यानंतर उदयला वर तटबंदीसारखे बांधकाम दिसले त्याने
तसे बोलुन देखील दाखवले पण त्यावर विश्वास बसत नव्हता कारण धुक्यात ते नीट दिसत नव्हते.
आणि आम्ही असेच पुढे चालत राहिलो. समोर थेाडया अंतरावर आम्हाला डोंगराचे बरेच दगड पडलेले
दिसेल. आमच्या जीवाज जीव आला कारण आता येथेच कुठेतरी रस्ता असणार असे वाटले.
येथुनच गडावर जाण्यासाठी पाय-या आहेत. ज्या शोधण्यासाठी आम्ही जवळ-जवळ संपूर्ण गडाला फेरी मारली
येथुनच गडावर जाण्यासाठी पाय-या आहेत. ज्या शोधण्यासाठी आम्ही जवळ-जवळ संपूर्ण गडाला फेरी मारली
त्या पडलेल्या दगडांमधून थोडे पुढे गेलो तर काय? आमच्या कल्पना शक्तीच्या पलीकडे. आपण विचारही करू
शकणार नाही अशा ठिकाणी गडावर जाण्यासाठी असणारा रस्ता जणु आमची वाटच पाहत होता. असे
म्हणण्यापेक्षा आम्हाला हिणावत होता की बघा तुम्ही माझ्या एवढा जवळ आलात तरी मी तुम्हाला
पटकन दिसु शकलो नाही. खर तर ही किमया त्या स्थापत्यशास्त्राज्ञाची . खरच त्या काळातील
लोंकाना मनोमन सलामच केला. कारण एवढया जवळ येवुन देखील येथे गडावर जाण्यासाठी पाय-या
आहेत हे आम्हाला समोर गेल्याशिवय कळले नाही.
बसगडावर जाण्यासाठी असणारा दगडी जीना
बसगडावर जाण्यासाठी असणारा दगडी जीना
तो जिना बघुन आमच्या संर्वाचा थकवा कुठल्याकुठे
निघुन गेला व एक नवा उत्साह अंगांत संचारला या किल्याचे मुख्या आकर्षण म्हणजे हा जिना!
कातळात खोदुन काढलेला सर्पिलाकार जिना होय. तसेच त्यात असमान उंचीच्या असलेल्या पाय-या.
आणि त्यात भर म्हणून की काय जिन्याच्या दोन्ही बाजूला दहा फुट उंचीच्या उभ्या कातळ
भींती . जने या पाय-या वजा जिन्याची निर्मीती केली असेल त्याला खरच माझा मानाचा मुजरा.
किती विचार केला असेल त्योन हा जिना निर्माण करतांना. सर्वात प्रथम तो जंगलात लपलेला
दुरून काय पण जवळ पोहचल्यानंतरपण लवकर लक्षात न योणारा.दोन्ही बाजूने असणा-या उंच कातळ
भिंती.
प्रवेशव्दाराच्या आतील रचनेवरून तेथे पाहरेक-यांच्या
देवडया असाव्यात परंतु आज या सर्व भागाची पडझड झालेली आहे. तसेच काही जानकरांच्या मते याचा काही
भाग मातीखाली गाडला गेलेला असावा. मात्र माझ्या असे निदर्शनास आले की, प्रवेशव्दारतुन
आत प्रवेश केल्यानंतर देखील काही पाय-या या सुस्थीतीत आहेत. त्यामुळे एखद वेळी या प्रवेशव्दाराची रचनाच मुळी अशीच केलेली
असावी. जशी ती आता दिसते.
सर्पिलाकार जिन्यावरून किल्यावर प्रवेश
करते वेळी आम्ही मनसोक्त फोटो काढण्याचा आंनंद घेतला. फोटो काढतच आम्ही प्रवेशव्दारातून
आत किल्यावर प्रवेश केला. मात्र या ही किल्यावर काही विकृत विचारांचे व्यक्ती व त्यांचे
कृत्य दिसलेच किल्याच्या भितींर नावे टोलेली दिसली की खरच या लोकांची लाज वाटते . ज्या
आपल्या इतिहासाची आपण नीट देखभाल ठेऊ शकत नाही पण कमीत कमी ती खराब तरी आपण करणार नाही
याची देखील आपण दखल घेत नाही.
प्रवेशव्दारातुन आत शिरताच एक ग्रुप एव्हाणा
खाली उतरत होता. आम्ही. त्यांना विचारले की ते कोणत्या रस्तयोन आले तर त्यांनी सांगीतले
की आम्ही निरगुडपाडयातुन वर आलो. दीड-दोन तास लागले. तसेच एकाने असेही सांगीतले की,
खाखडया रय्तयाने गाडी अर्ध्यारस्तयापर्यंत वर आणता येते. आणि मनोमन आमचया निर्णय शमतेची
आम्हालाच लाज वाटली कारण आम्ही संपूर्ण डोंगराला फेरी मारून वर आलो होतो. तेही योग्य
रस्ता सांगीतला असतांना दुस-या रस्त्याची निवड केल्यामुळे. जर या रस्त्याने आलो असतो
तर एव्हाणा गड पाहून परतीच्या रस्त्यावर असतो. असो म्हणतात ना? नेहमी वेगळा अनुभव घेत
रहावे. ते हेच. कारण समोरच्या रस्त्याने आलो असतो तर शंकराची पींड असणारी गुहा आणि
चौकोणी आकाराचे खडकात खोदलेले पाण्याचे टाके पहायला भेटले नसते.
प्रवेशव्दारातून किल्यात आत शिरल्यावर
समोर व उजव्या बाजूला अशा दोन वाटा किल्यावर जातात. यातील दोन्ही वाटा आपल्याला किल्यावर
घेऊन जातात. पण उजव्या बाजूच्या पायवाटेने आपण दहा मिनटांत किल्याच्या विस्तीर्ण अशा
पठारावर पोहचतो. किल्याच्या पठारावर आज फक्त पडक्या वास्तुचे / मंदीराचे अवशेष बुजलेले
पाण्याचे टाके शेवटच्या घटका मोजत आहेत.
तसेच एक पाण्याचा तलाव व तलावाच्या काठी असलेले
हनुमानाचे मंदीर . एके काळी मंदीर असावे मात्र आज फक्त चारी बाजूनी दगडे लावून आत दगडात
कोरलेली हनुमानाची मुर्ती आपणस पहावयास मिळते.
कातळात
कोरलेली हनुमानाची मुर्ती

छप्पर
नसलेले मंदीर
एके
काळी या मंदीराचा काय थाट असेल समोर पाण्याचा तलाव दररोज मंदीरात आरती पुजा होत असणार
. आणि आज तेथे क्वचीतच पायथ्याच्या गावातील कोणी वर्षातून एखद वेळी दिवाबत्ती आरती
प्रसाद करत असणार.
आम्ही त्या हनुमानाच्या मुर्तीसमोर नतमस्तक होऊन
आर्शिवाद घेतला. ऐव्हाना आसंमतांत धुक्याचे साम्राज्य सुरू झाले होते. त्यात भरमसाठ
पायपीठ केल्यामुळे थकवा तसेच भूक् देखील भरमसाठ लागली होती. आणि आमच्याकडे खान्यासाठी
वर सांगीतल्याप्रमाणे दोन पारेले जी चे पुडे होते ते काढण्यात आले. आणि पेटपुजेचा काय्रक्रम
उभ्याउभ्यानेच चालू झाला. पोटाला थेाडा आरम वाटला.
बसगडाच्या माथ्यावरून दिसणारा हरिहर गड
बसगडाच्या माथ्यावरून दिसणारा हरिहर गड
एव्हाणा पाऊसाला सुरवात झाली होती. आणि त्यात धुके एवढे होते की समोरचे देखील दिसत नव्हते. तशातच आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. प्रवेशव्दारातुन निघताना काही तरी मागे राहुन चाललय असे जाणीव होत होती . एकएक पायरी उतरतांना मन कासावीस होत होते. परंतु त्याला काही करू शकत नव्हतो. कारण आजच्या जगात आपण सिमेंटच्या जगंलात राहणारे होतेा. आणि आता परत त्याच जंगलात जाऊन परत तोच दिनक्रम चालू ठेवणे भाग होते.
कितीही ठरवले तरी या सींमेंटच्या जंगलापेक्षा माझे
मन या गडांवरच जास्त रमते. त्यामुळे मनोमन
ठरवून पुन्हा दुस-या एखादया गडावर जाण्याचे ठरवून बसगडाचा निरोप घेतला.