Wednesday 22 April 2020



चावंड – प्रसन्नगड

            23 जून 2019 चांवड करायचा असे ठरले होते. सकाळी 8.00 वाजता माळशेज घाट पार करून गणेश खिंड चढत असतांना अनपेक्षीतपणे अचानक उदय भेटला. आणि अचानक ठरलेला प्लान चेंज करून चांवड व हडसर खिळयाच्या वाटेने करायचा असे ठरविले. उदयची बाईक जवळच्याच गावातील एका घराच्या बाजूला  लावून आम्ही दोघे माझ्या बाईकने चांवड कडे निघालो. सकाळी 9.00 वाजता चांवड किल्लयाच्या पायथ्याला बाईक लावून आम्ही गड चढायला सुरवात केली. गडावर संवर्धनाचे चांगलेच काम झाल्यामुळे पायथ्यापासूनच गडावर जाण्यासाठी दगडी पाय-या आहेत.
दगडी पाय-या


पाय-यांनी आपण 15 मिनटातच आपण गडाच्या रेलींग बसविलेल्या ठिकाणी येवून पोहचतो. या ठिकाणच्या पाय-या सुरूंग लावून उध्वस्त केलेल्या आहेत. हा देखील इग्रजांचाच एक उपद्रव येथे देखील दिसुन येतो. रेलींग लावण्या आगोदर गडावर जाण्यासाठी तार लावलेली होती ती आज देखील आहे मात्र रेलींग लावल्यामुळे गडावर जाण्याचा रस्ता सोपा झालेला आहे.
अरूंद पाय-यांचा मार्ग     
या अरुंद पाय-या चढून वर गेल्यावर समोरच एक प्रश्स्त पाय-यांचा राजामर्ग लागतो. या पाय-या जवळ-जवळ तीन मीटर रूंद असून एका समान अंतरावर असल्यामुळे हा पाय-यांचा रस्ता बघण्यासारखा आहे.  या पाय-यांचे घडीव चिरे बसविलेले आहेत मात्र या चि-यांच्या मधील माती पुर्णपणे निधून गेलेली आहे.



पाय-यांचा राजामर्ग
            या पाय-यांनी  वर चढत गेल्यास अपण तटबंधीजवळ कातळात कोरलेल्या दरवाजात येवून पोहचतो. मात्र दरवाजाच्या थोडे अलिकडे डाव्या बाजूला एक कातळात खोदलेली विहीर आहे.
बुजलेली विहीर  

 मात्र सदर विहीर बुजलेली तसेच आत पाला पाचोळा पडलेला आहे. विहीर बघुन परत पाय-यांच्या मार्गाने आपण किल्याच्या मुख्या दरवाजात येवून पोहचतो. 

















कातळात कोरलेली गणेश मुर्ती

दरवाजात पोहचताच प्रथम दर्शनी आपले लक्ष वेधून घेतो तो म्हणजे कातळात कोरलेली गणेश मुर्ती काळाच्या ओघत लुप्त होत चाललेली आहे.
मुख्य दरवाजा 

 आपल्या डाव्या बाजूस मुख्य दरवाजा लागतो दरवाजाच्या वर देखील एक गणेशमुर्ती कोरलेली आहे. मुख्य दरवाजाचे चिरे आता सुटे लागले आहेत. त्यामुळे वरील चौकटीला लोंखडी पाईपने आधार दिलेला आहे. याच्या पुढील चौकट मात्र आज देखील व्यवस्थीत टिकून आहे. एकही दगड न निखळता. खरच हे दगडी बांधकाम करणा-या कामगारांचे  करावे तितके कौतुक कमीच पडेल. त्यांच्या कौशल्याला मानाचा मुजरा. 





या प्रवेशव्दारातुन  दहाच  पाय-या चढून आपण गडावर प्रवेश करतो. येथुन अजून काही पाय-या चढून वर गेल्यास आपण अनेक इमारतींच्या पडक्या अवशेशांजवळ येवून पोहचतो.




सदरेकडे जाणारा रस्ता












येथे पुर्वी सदर होती असे येथील अवशेषांवरून जाणवते. येथेच बसून मुलकी कारभार पाहीला जात असे. सदरेच्या उजव्या बाजूची वाट चामुंडा देवीच्या मंदीराकडे जाते तर समोरची वाट आपल्याला एका मोठया पुष्करर्णी जवळ घेवून जाते. गडाच्या समोरील उंच टेकडीवर चामुंडा मातेचे मंदीर आहे. मंदीरातील मुर्ती प्राचीन आहे मात्र मंदीराचा जिर्नोधार केल्यामुळे मंदीराचे बांधकाम  नवीन आहे. मंदीराच्या बाजुला जुन्या मंदीराचे अवशेष विखुरलेले पडलेले आहेत. या अवशेषांत एक तुटलेली मुर्ती देखील पहावयास मिळते. मंदीरासमोर एक दिपमाळ आहे. मंदीर बघून आल्या वटेने खाली टेकडी उतरून खाली यावे.
           
पुष्करणी
पुष्करणी

पुष्करणीच्या पाण्यावर हिरव्या जलपर्णीचा तवंग चढलेला आहे. 








उध्वस्त शिव मंदीर





पुष्कर्णीच्या समोरच एक उध्वस्त शिव मंदीर असून  आत उध्वस्त शिव पींड आहे. मंदीरावरील छत पडलेले आहे.



पुष्करणीच्या उजव्या बाजूने आठ-नव कोनाडे आहेत 
त्यातील काही कोनाडयात मुर्त्या आहेत. 




काळाच्या ओघात फुटलेले नंदी शिल्प       
            पुष्कर्णीच्या बाजूलाच रस्तयात एक मोठा तुटलेला एकाच दगडात घडीव नंदी आहे. परंतु याचे तोंडच काळाच्या ओघात तुटलेले आहे. बहुतेक हा नंदी मंदीरासमोर असावा. परंतु तो बाहेर कसा काय आला ?

           










शौचालयाच्या उजव्या बाजूकडील भागातून पाणी जाण्यासाठी असेलेली जागा


शौचालयातील दगडी भांडे









पुष्कर्णच्या डाव्या बाजूला खालील बाजूस एक दगडी चवथरा दिसतो. ही एक वास्तू आहे. ही वास्तु म्हणजे ब-या कमी गडावर दिसणारी ही वास्तु आहे. ही वास्तु म्हणजे गडावरील त्या काळातील शौचालय आहे.  

शौचालयाच्या मागील बाजूच्या भागातून मळ बाहेर जाण्यासाठी असेलेली जागा
















 शैचालयात शैचालयाचे दगडी भांडे आज देखील सुस्थीतीत आहे. या भांडयाची रचना दोन भागात केलेली दिसते. शौचालयातून पाणी जाण्यासाठी स्वतंत्र रचना केलेली आहे तर मळ जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली दिसून येते.


पहिल्या टाक्यात खाली उतरण्यासाठी असणा-या पाय-या
दरवाजावरील गणेश मुर्ती 
            










पुष्कर्णी समोरून पुढे चालत गेल्यास डावया बाजूला तटबंदीकडे चालत गेल्यास आपण सप्त मातृका जवळ येवून पोहचतो. सप्त मातृका म्हणजे सात पाण्याच्या टाक्यांचा समुह. या सातही पाण्याच्या टाक्यांत पाणी आहे. तसेच पहिल्या टाक्यात खाली उतरण्यासाठी पाय-या म्हणजेच कातळात कोरलेला  जिना बनविलेला आहे.जिना जेथे संपतो तेथे दरवाजा आहे. दरवाजावर गणेश मुर्ती कोरलेली आहे. तसेच चौकट आकर्षक सजावट केलेली आहे. या सात टाक्यांमुळे गडावर पाण्याची मुबलक सोय केलेली पाहवयास मिळते.
सात पाण्याच्या टाक्यांचा समुह.
कातळ कोरीव लेणी समुह

लेणीतील दगडी चौकट
      सप्त मातृकांच्या बाजून थोडे खाली उतरल्यास आपण कातळ कोरीव गुहांजवळ येवून पोहचतो. यातील दोन गुहा सुस्थीतीत आहेत. 




कातळ कोरीव लेणी समुह
  कबर पडकी वास्तु  


गुहा बघुन परत वर आल्यावर समोरच एक पडकी वास्तु दिसते. येथे कबर सदृश वास्तु दिसते. एका दगडी शिळेला पांढंरा चुना लावलेला आहे. 














बुजलली पाण्याची टाकी




हे सर्व बघुन आल्यावाटेने परत अपण पुष्कर्णी जवळ येतो. येथुन पुढे सरळ चालत गेल्यास वाटेत पाच अर्धवट बुजलेल्या अवस्थेतील पाण्याची टाके आहेत. 
बुजलली पाण्याची टाकी





बुजलली पाण्याची टाकी














दोन बुजलली पाण्याची टाकी 


असेच गडाच्या मागील बाजूस चालत गेल्यास वाटेत दोन बुजलेली टाकी पाहावयास मिळतात. 






गडाच्या मागील बाजूस कडयाजवळ असणारी दोन माठी पाण्याचे टाके

                गडाच्या मागील बाजुस विस्तीर्ण असा परिसर आहे मात्र या परिसरात कोणतेही बांधकाम आडळून येत नाही. मात्र गडाच्या मागील बाजूस कडयापासून थोडया अंतरावर दोन मोठी  पाण्याची टाकी आहेत. 
टाक्यांत उतरण्यासाठी असणा-या पाय-या




दोन्ही टाक्यात पाणी असुन टाक्यात उतरण्यासाठी पाय-यांची  सोय केलेली आहे. पाण्याची टाकी बघुन पुढे चालत गेल्यास आपण मुख्या सदरेजवळ येतो. येथेच गडाची फेरी पुर्ण होते.


गडाच्या मागील बाजूस कडयाजवळ असणारी दोन माठी पाण्याचे टाके
                    गडाचा विस्तार खुप विस्तीर्ण आहे. त्यामुळे गड फेरीसाठी एक ते दीड तास लागतो.  गडावर फिरतांना सातवाहन संस्कृतीचा प्रभाव असल्याचे जानवते. तसेच इग्रजांच्या राजवटीत इग्रजांनी हा गडाची खुप मोठया प्रमाणात नासधुस केल्याची माहिती सांगीतली जाते. त्याचेच उदाहरण म्हणजे गडावर येतांना  सुरूंग लावून तोडलेल्या गडाच्या पाय-या बघतांना याची प्रचीती येते.
चांमुडा देवी मंदीराकडे जाणारा रस्ता
पडक्या वाडयाचे अवशेष
पडक्या वाडयांचे अवशेष

पाय-यांचा राजमार्ग



Friday 8 February 2019


AMK(अलंग,कुलंग आणि मदन) फक्त थरार



                   खुप दिवसापासून मनात इच्छा होती की AMK(अलंग,कुलंग आणि मदन) हा ट्रेक करायचा. तो क्षण आज दि.25/11/2016 रोजी पुर्ण झाला. मात्र काहि कील्ले असे असतात की तेथे एकदा जाऊन मन भरतच नाही. आणि यातलाच एक किल्ला म्हणजे AMK होय. AMK म्हणजे तिन किल्यांची जोडगोळी अलंग, मदन आणि कुलंग हे अहमदनगर जिल्हयातील अहमदनगर - नाशिक  आणि ठाणे जिल्हयांच्या बॉर्डरवर  दिमाखात उभे आहेत. आणि  प्रत्येक भटक्यांना एकदा तरी यांवर येण्यासाठी जनू आमंत्रण देणारी ही तीन किल्यांची जोडी. 25नोव्हेंबर 2016 ला पहिल्यांदा AMK केला आणि त्याच्या प्रेमातच पडलो. आणि तेव्हाच ठरवले होते की पुन्हा यायचेच. मात्र त्यासाठी दोन वर्ष वाट पहावी लागली. AMK पुन्हा करण्यासाठी तो दिवस ठरला 23 आणि 24 नोव्हेंबर 2018. मि, उदय, भाई, युवराज,निलु असे आम्ही पाच जन. 23 नोव्हेंबरला उदय, भाई, युवराज,निलु हे चार जन आसनगांव वरून तर मि  नाशिक वरून आंबेवाडी या बेस  व्हिलेजला सकाळी सात वाजता पोहचलो. या ट्रेक साठी आमचा गाईड आंबेवाडीतील विठठल आमची वाट पाहतच होता. आमच्या गाडया  विठठलच्या घराच्या अंगणांत लावून तात्काळ समोर दिसणा-या गडाकडे आमचा चम्मू निघाला,
आणि…. मग आमचा  ट्रेक सुरू झाला.समोर सहयाद्रीच्या रांगेतील अलंग कुलंग आणि मदन दिसत होता जनु तो आम्हाला सादच घालत होता. एक पुर्ण पर्वतरांग डोळयांसमोर दिसत होती…. डावीकडे अलंग मध्ये मदन आणि उजविकडे कुलंग…. रांगेच्या पायथ्यापासून ते डोगंराच्या माथ्यापर्यंत मन कधीच पोहचले होते. आता फक्त पाठीवरच्या बॅगा पोहचवण्यासाठी पायपीट करावयाची होती……..


अलंगच्या वाटेवर कातळात कोरलेले एक शिल्प आहे. या ठिकाणी विठठल ने आम्हाला एक  माहिती सांगीतली कि या शिल्पातील तिन बाण म्हणजे अंलगवर जाण्याचे तीन मार्ग आहेत मात्र त्यापैंकी फक्त ऐकच  मार्ग आजपर्यंत सापडलेला आहे. ज्या मार्गानेच सर्वजन गडावर जातात. इतर दोन मार्ग अजून देखील कोणाला भेटलेले नाहीत. तसेच  त्याने असे देखील सांगीतले की, गडावर गुप्त धन देखील आहे  आणि  ते मिळविण्यासाठी अनेक मांत्रीक आमावस्सेला किंवा पोर्णीमेला गडावर येत असतात. अशाच एका मांत्रीकाला त्याने एकदा गडावर घेवून गेला होता. मात्र त्याला खाली येता नाही आले तर त्याला त्यांनी उचलून खाली आणले होत
आज पर्यंत  आम्ही हेच समजत होतो की, गडाची जी काही नासधूस झलेली आहे ती फक्त इग्रंजानी केली आहे. मात्र त्यापेक्षा  धिक नासधूस तर या अशा मांत्रीक किंवा गडावरील धन शोधणा-या माथेफीरूनिं  अधिक केलेली समजली. कारण गडावरील  शिव मंदीर हे अशाच लोकांनी उदवस्त केल्याचे समजले.
       या सर्व ‍ बातचीत होईपर्यंत आम्ही कातळात खोदलेल्या पाय-यांपर्यंत येऊन पोहचलो. समोर वरील बाजूस एक गुहा दिसत होती. याच गुहेत बॅगा ठेवून आम्ही मदनच्या दिशेने आगेकूच करणार होतो. पुढच्या दहाच मिनटांत आम्ही गुहेजवळ पोहचलो. सकाळी लवकर निघालो असल्यामुळे आत्तापर्यंतच्या चढाईने सर्वांनाच चांगली भूक लागलेली होती. त्यामुळे आम्ही प्रथम नास्टा करण्याचे ठविले, बरोबर आणलेला फराळावर अक्षरक्षा सर्वांनी ताव मारला पाणी पिऊन सर्वांनुमते बॅगा येथेच ठेवण्याचे ठरले मात्र आमचा गाईड विठठल याने असे सुविले की, गुहेत कोणी राहणार नाही त्यामुळे तुम्ही सर्व बॅगा रस्त्याच्या बाजूलाच झाढीमध्ये ठेवा व वरून झाडाच्या फांदया तोडून टाका म्हणजे माकडांपासून बॅगा सुरक्षीत राहतील लगेच त्याच्या म्हणण्यानुसार बॅगा रस्त्याच्या बाजूच्या झाडीत ठेवून आम्ही अलंगच्या टॅर्व्हसने मदनच्या दिशेने चालू लागलो. पुढच्या दहामिनटांतच आम्ही अलंग  आणि मदनच्या मधल्या    खिडींत पोहचलो. येथुन ख-या अर्थाने मदनच्या चढाईला सुरवात होते. 


पाचच मिनटांच्या चढाईनंतर लगेचच मदनच्या कातळकोरीव पाय-यांजवळ येवून पोहचलो. 




पाय-या चढून वर गोलो आत्ता डोंगरांच्या कडेकडेने डोंगरांच्या मागील बाजूस जायचे होते. खरे तर मागच्या वेळेस मी ज्या ग्रुप बरोबर आलो होतो त्यांनी याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने येथे रोप लावलेला होता. मात्र आज आम्ही याठिकाणी कोणताही रोप लावलेला नाही. म्हणून आम्ही सर्वजन सांभाळून येथून चालू लागलो. कारण एका बाजूला कातळ तर दुस-या बाजूला खोल दरी आणि त्यात वाट ऐवढी निमूळती होती की एका वेळी एकच व्यक्ती चालू शकेल. हा अवघड पॅच आम्ही काळजीपूर्वक पार करून एकदाचा मदनच्या  कातळ    भींतीजवळ येवून पोहचलो. 


विठठल  आमच्या बरोबर होताच. लगेच विठठलने आपल्या बॅगेतील हारनेस काडून आमच्याकडे दिले व कसे घालायचे ते सांगीतले. विठठलने रोपचा एक टोक स्वत:च्या कमरेला बांधून फ्री क्लाइबींग करत बघता बघता ती कातळ  भींत तो वर चढून गेला. वर त्याने सेटअप लावून त्याने रोप खाली टाकला व आम्ही सर्व जन एक-एक करून आम्हाला त्याने वर घेतले. विठठल येथेच थांबून राहिला व आम्ही पाच जन वर गडावर चढून जाणार होतो.
          
               मदनवर चढाई करणे म्हणजे एक थरार तो फक्त याच गडावर मिळतो. कारण संपूर्ण गडावर चढतांना एका बाजूला कातळ तर दुस-या बाजूला खोल दरी, अरुंद वाट, मध्येच  कातळात खोदलेल्या पाय-या असा हा मदनचा प्रवास खरोखर भीतीदायक, अल्हाददायक  प्रसन्न करणारा. पुढच्या दहामिनटांतच आम्ही पुन्हा कातळ कोरीव पाय-यांजवळ येवून पोहचलो याठिकाणी एक गुहा आहे बहुतेक पाहरेक-यांसाठी बनवलेली असावी. 

या पाय-यांवरून अलंगचा पसारा बघुन मन प्रसन्न होऊन जाते. येथून अलंगचा एक भाग चंद्राच्या कोरीरसारखा दिसतो. अलंगचे ते अप्रतीम दृश्य डोळयात तसेच कॅमे-यात टिपून आम्ही गडावर प्रवेश केला. प्रवेश व्दार आज तरी शिल्लक नसले तरी त्या खुना आजही त्याची जाणीव करनू देतात. उजव्या डाव्या बाजूला काही उदवस्त बांधकामे दिसतात. एके काळी ते पाहरेक-यांच्या खोल्या असाव्यात. आज मात्र तेथे फक्त दगडांचे खच पाहवयास मिळतात.

      बाजुलाच पाण्याचे चार टाके आहेत त्यातील दोन टाकी पुर्णपणे बुजलेली आहेत तर दुस-या दोन टाकयात पिण्याचे पाणी आहे. तसेच या टाक्यांमध्ये असणारे रंगीबीरंगी मासे हे एक आश्चर्यच येथे पहावयास मिळते. या पाण्याच्या टाक्यांच्या थोडेसे वरील बाजूस एक गुहा आहे.
 या गुहेत तीस लोकांची राहण्याची व्यवस्था होऊ शकते. गुहेच्या समोरून एक रसत्ता आपल्याला गडाच्या सर्वोच्च टोकावर घेवून जातो. सर्वोच्च टोकावंरून एका बाजूला अफाट अशा अलंगचा पसारा तर दुस-या बाजूला कुलंगचा बेलाग कडा असा हा नजारा अप्रतीम निसर्ग-सौंदर्याचा नजारा आम्ही आमच्या डोळयात व आमच्या कॅमे-यात टिपुन परत परतीच्या प्रवासला सुरवात केली व सुरक्षीत पणे कातळ भींतीपर्यंत येवून पोहचलो विठठल आमची वाट पाहतच होता. पुन्हा आम्ही हारनेस लावून खाली उतरलो.  आणि अशाप्रकारे आम्ही निसर्गाचा अप्रतीम ठेवा मनात साठवून आम्ही अलंगकडे प्रस्थान केले. 
अर्धा तासाचा प्रवासानंतर आम्ही परत अलंगच्या गृहेजवळ आलो. बॅगा घेवून तात्काळ अलंगच्या पहिल्या कातळ टप्प्याजवळ येवून पोहचलो. विठठल ने आमच्या आगोदर तेथे पोहचून रोप लावून ठेवला होतो. रोपला धरून आम्ही तो अवघड टप्पा पार करून अलंगचा सर्वात कठीण अशा कातळ भींतीजवळ येवून पोहचलो. आत्ता परत एकदा विठठल ने रोपचे एक टोक आपल्या कमरेला बांधून सुरक्षीत पणे वर चढून गेला व सेटअप लावून त्याने आम्हाला वर घेतले. सर्वात शेवटी मी वर चढलो वर जातांना मध्ये मध्ये लावलेले क्लीप काढत वर गेलो. येथून वर जाण्यास पाय-या आहेत मात्र एका वेळेस ऐकच व्यक्ती वर जावू शकते किंवा खाली उतरू शकते. हा टप्पा आम्ही सर्व जन सावकाश  व सुरक्षीतपणे वर चढून गेलो वर चढून गेल्यास दोन्ही बाजूला पाहरेक-यासाठी असणा-या उदवस्त घरांचे अवशेष दिसतात. एके काळी या घरांचे सौदंर्य काही वेगळेच असणार. येथेच आम्ही बॅगा ठेवून युवराज येथे थांबला व आम्ही संध्याकाळी चूल पेटवण्यासाठी लाकडे गोळा करण्यासाठी गेलो. वर चढून आल्यावर उजव्या बाजूला दोन पाण्याची टाके आहेत मात्र यातील पाणी पीण्याग्य नाही. तसेच यांच्या पुढे एकविहीरीसारखे दगडी बांधकाम आहे मात्र ही विहीर नसून यात ‍ शिव  लींग आहे. 
आम्ही लाकडे जमा करण्यासाठी मदनच्या दिशेने निघालो. वाटेत अनेक उदवस्त बांधकामे पाहवयास मिळतात. एके ठिकाणी वाळलेल्या झाडाची लाकडे जमा करून आम्ही अलंगच्या मदनकडील शेवटच्या टोकापर्यंत गेलो. समोरील टोकांवरून मदनच्या पाय-या अप्रतीम अशाच दिसत होत्या.

शेवटच्या टोकांवरून समोर मदन व मदनच्या मागे कुलंग किल्ला दिसत होता. सर्वकिल्ला बघून तसेच जमा केलेली लाकडे बरोबर घेवून आम्ही मदनच्या गुहेत आलो. मोठया गुहेत एक ग्रुप आधीच येवून थांबला होता. 
त्यामुळे आम्ही बाजूच्या गुहेत राहायचे ठरविले. गुहेत बॅगा ठेवून आम्ही सर्व जन प्रथम पेट पुजेच्या मागे लागलो. कारण आम्ही दुपारचे जेवन केले नव्हते. आम्ही बरोबर आणलेल्या जेवणावर अक्षरशा तुटून पडलो. जेवन झाल्यानंतर थोडा वेळ आराम केला.
       सांयकाळी चार वाजता आम्ही अलंग गडाचा राहिलेला किल्ला बघण्यासाठी निघालो  गुहेच्या समोरूनच एक वाट वर किल्यावर जाते त्या वाटेने आम्ही वर चढण्यास सुरवात केली. वाटेत दोन गुहा लागतात, मात्र या गुहा राहण्यायोग्य नाहीत. थोडे वर गेल्यानंतर वाटेत अनेक उदवस्त घरांची जोती दिसतात. या उदवस्त वास्तूच्या मधूनच आपण पुढे जातो. पुडे गेल्यानंतर अलंगवरील ती जागा आपणास पहावयास मिळते ती म्हणजे सात पाण्याची टाके. ही सात पाण्याची टाके अशा प्रकारे बनवलेली आहेत की एक पाण्याचे टाके भरले की त्यातील पाणी दुस-या टाक्यात जाईल याची व्यवस्था केलली आहे. व सर्व टाक्यांच्या शेवटी खालील बाजूस पाणी आडवण्यासाठी मोठी भींत बांधलेली आहे. याच टांक्यांतील पाणी पीण्यासाठी वापरण्यात येते.पाण्याची टाकी बघुन आम्ही गडावरील सर्वात मोठा राजवाडा बघण्यासाठी निघालो. राजवाडयाची तीन बाजूच्या  भींती आज देखील उत्तम अवस्थेत आहेत. राजवाडयात प्रवेश करतांना आपण अगदी त्या काळातच गेल्याचा अनुभव येतो. राजवाडयाच्या दुस-या बाजूला मोठ मोठे दगड पडलेले दिसतात. तसेच थोडे पुडे तीन पाण्याची टाकी असून त्यातील एक पाण्याचे टाके कोरडे आहे. तर दोन टाक्यांत पाणी आहे. तेथुन थोढे पुडे मोकळयाजागेत एक उदवस्ति शिवमंदीर आहे. शिवमंदीरात शीव पींड असून हे मंदीर बहुतेक दोन भागात असावे. कारण दोन उदवस्त भाग दिसतात. दोन्ही भागाची पडझाड झालेली असून मंदीराचे जोते तेवढे आज  शिल्लक आहेत. मंदीराच्या समोरच एक शिलालेख ठेवलेला आह. तसेच आजूबाजूला दोन-चार पाण्याची टाके आहेत.तसेच मंदीराच्या मागील बाजूस दोन दगडी स्तंभ आहेत. खरे तर याच बाजूला मंदीराचे प्रवेशव्दार असावे मात्र आज त्याचा  एकही अवशेष शिल्लक नाही. मंदीरापासून पूढे डोंगरात ऐक गुहा आपणास दिसते. या गुहेजवळ गेल्यास गेहेच्या आत पाणी आहे. तसेच गुहेच्या समोर एकदिपस्तंभ आपली अखेरची घटका मोजत दिमाखात उभा आहे. त्याच्या बाजूलाच एक दगडी देवी मुर्ती ठेवलेली आहे. कदाचीत एके काळी येथे देवीचे मंदीर असावे. ही गडाची दक्षीन बाजू असून येथेच आपली गडफेरी पुर्ण होते. येथून भंडारदरा धरणाचे बॅकवॉटर दिसते. अप्रतीम असे नीसर्गसौदंर्य येथून पहावयास मिळते.फोटो प्रेमींसाठी जनू ही जागा म्हणजे पंढरीच. थोडयाच वेळात सुर्यनारायण क्षीतीजावर जावून वीलीन होतांना ज्या रंगांची उधळण निसर्गाने केली ती म्हणजे अप्रतीमच. किल्यावरून सुर्यास्त होतांना हळुहळु अंधाराचे साम्राज्याची सुरवात झाली. पक्षी आपआपल्या घरटयाकडे निघाले त्याप्रमाणे आम्ही देखील आजच्या मुक्कामाच्या ठिकाणाकडे  म्हणजेच गुहेकडे निघालो. गुहेत जावून आज रात्रीच्च्या जेवणाची सोय करायची होती.
       मात्र मनामध्ये पुन्हा घालमेल सुरू झाली, या वेळी देखील अलंग पुर्ण बघून न झाल्याची, कारण दक्षीण बाजूला असणारा बुजलेला दरवाजा बघण्यासाठी एक तासाची पायपीट करून खाली उतरावे लागणार होते. मात्र आम्ही हे बघण्यासाठी पुन्हा एकदा येवू असे ठरवून आजची भ्रमंती येथेच थांबववून मुक्कामाचे ठिकाणी म्हणजेच गुहेत येवून रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू केली. जेवन करून कधी झोप लागली कळलेच नाही.

चावंड – प्रसन्नगड             23 जून 2019 चांवड करायचा असे ठरले होते. सकाळी 8.00 वाजता माळशेज घाट पार करून गणेश खिंड चढत असतांना ...